श्रीरामपुर : ही तर विरोधकांची राजकीय स्टंटबाजीचा हा दुदैवी प्रकार असून, मोर्चे, आंदोलन करून राजकीय स्वार्थासाठी व लोकांची सहानुभूती मिळवण्याचा हा विरोधकांचा केविलवाणी प्रयत्न असल्याचे दत्तनगरचे सरपंच सुनील शिरसाठ यांनी सांगितले. आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावरच लोकांची इतकी काळजी का वाटतेय असा प्रतिप्रश्न सरपंच सुनील शिरसाठ यांनी विरोधकांना केला आहे.

दत्तनगर भागातील प्रभाग क्रमांक १ मध्ये बाराशे ते तेराशे लोकसंख्येचा वार्ड आहे या वार्डात ८० टक्के काम हे मार्गी लागले आहे जसजसा निधी उपलब्ध होतो तसा तो सर्व गावामध्ये विभागून खर्च केला जातो तरीपण वार्ड नंबर एक मध्ये शासनाच्या नियमानुसार सर्व गटारी स्स्ते हे पूर्ण झाले आहे. साफसफाई देखील वेळोवेळी सफाई कामगार हे करत असतात. पाणीदेखील दिवसाआड दिले जाते. काही लोकांनी पाणी भरताना मोटार लावल्यामुळे मोजके लोकांना पाणी पोहोचत नाही. त्याच्यावर लवकरच पर्याय काढला जात आहे. कचर्‍याची गाडी दिवसा प्रत्येक वस्तीत जात आहे. गाव मोठा असल्यामुळे घंटागाडी एकच आहे तरीपण संपूर्ण कचऱ्याचं व्यवस्थापन सुरळीतपणे केले जातं आहे. ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे आणि आणि खरोखर जिथे काम झालेले नाही तिथेच तो खर्च करता येतो याच्या व्यतिरिक्त तो कुठेही वापरला जात नाही.

[URIS id=1702]

आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे. त्याठिकाणीच निधी वापरण्यात आलेला आहे. स्मशानभूमीची देखील वेळोवेळी गरज असेल त्यावेळेस तिची दुरुस्ती केली जाते. आतादेखील दुरुस्तीसाठी तिचा प्रस्ताव हा पंचायत समितीकडे पाठवलेला आहे प्रशासकीय काम असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे. पंचक्रोशीतील सर्वात चांगली स्मशानभूमी म्हणून दत्तनगरच्या स्मशानभूमीकडे बघितले जाते. सध्या दत्तनगर ग्रामपंचायतीकडे स्वत:ची स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अग यिजत त लाईट लावण्यास अडचण होत आहे. तरीपण ज्या ज्या ठिकाणी लावण्यासाठी पोल आहेत त्या ठिकाणी लाईट लावलेले आहेत. ग्रामपंचायतची स्वतःची स्ट्रीट लाईट लवकरच मंजूर होणार आहे. त्यावेळेस संपूर्ण गावात पोल टाकून अधिकृतपणे लाईट लावण्यात येतील.

गावांतील विविध प्रश्नांवर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यांसह, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती स्वत: लक्ष घालून ग्रामस्थांच्या समस्या लक्ष देऊन सोडवणूक करत असतात बाकी सर्व हा राजकीय स्टंट असल्याचे शेवटी सरपंच सुनील शिरसाठ यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here