[URIS id=1702]

श्रीरामपूर – गेल्या अनेक दिवसापासून श्रीरामपुर नगरपालिकेचे शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले आहे त्यामूळे शहराच्या विविध भागात मोठ्याप्रमानात कचरा साचून नागरीकांचे आरोग्यास मोठा धोका निर्माण झालेला आहे शहरात सर्व भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे एवढेच नवे तर भागात जोडणा-या रेल्वे अंडर ग्राऊंड पुलाच्या खाली देखील मोठय़ा प्रमाणात पाणी साचलेल्याने शहराच्या तसेच या ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते यातून अनेक अपघातही घडलेले आहेत. सिध्दार्थनगर मध्येही मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून सफाई कर्मचा-यांनी गटारी वेळेल साफ न केल्याने गटारी तुंबून हे पाणी रेल्वे जवळील अंडरग्राउंड पुलाखाली येते व मग वाहनधारक व नागरीकांना तसेच कॉलेजला जाणारे-येणारे विद्यार्थी-विद्यार्थीनींना जाण्यायेण्यास मोठा त्रास होत आहे सध्या कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव असून शहरामध्ये मोठया प्रमाणावर कचरा साचून डासांचे व इतर किटकांचे प्रमाण मोठे आहे त्यामूळे लहान बालके, वृध्द व्यक्‍ती यांचे आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे व यामूळे कोरोनाचा शिरकाव होवून मोठया प्रमाणा जिवीतहानी होऊ शकते नगरपालिकेच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामूळे संपूर्ण शहरास त्याचे परिणाम भोगावे लागणार आहे शहरातील घाण व कचऱ्याबाबत अनेक संघटना, पक्ष यांनी नगरपालिकेस अनेकदा तोंडी व लेखी निवेदने दिलेली आहेत परंतु नगरपालिकेने त्यांना केराची टोपली दाखविली आहे. नगरपालिकेत सत्ता आल्यापासून सत्ताधा-यांनी शहरात पूर्ण दुर्लक्ष केल्यामूळे गेल्या ४ वर्षापासून कुठलेही विकासकामे झाले नाही शहरवासीय हा त्रास गेल्या ४ वर्षांपासून सहन करीत आहे व आता यावर्षी नगरपालिकेची निवडणुक होत असल्याने सत्ताधारी विविध विकासकामांचा शुभारंभ करुन ‘शहरवासियांच्या डोळयात धुळफेक करीत आहे आम्हीच सर्व काही करु शकतो असा आव आणीत असल्याचाही घणाघाती आरोप आर.पी.आयचे रितेश एडके यांनी केला आहे ४ वर्ष काय सत्ताधारी
झोपले होते काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तरी नगरपालिकेने शहरातील संपूर्ण कचरा उचलावा तसेच तुंबलेल्या गटारी साफ करुन शहरामध्ये स्वच्छता करावी अन्यथा रिपाईचे वतीने नगरपालिका कार्यालयासमोर कचराफेको आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपाईचे रितेश एडके यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here