श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शहरातील नगरपालिकेवरचार वर्षांपूर्वी शिवसेनेच्या प्रमुख मदतीने नगरपालिकेचे सत्तांतर झाले आणि अनुराधाताई आदिक यांना नगराध्यक्ष पद भूषवण्याची संधी मिळाली त्यामागे शिवसेनेचा हा एक उद्देश होता की मागील सत्ताधिकाऱ्यांची टगेगिरी ला जनता वैतागली होती त्यामुळे नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक यांना एक संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून शहराचा काही तरी चांगलं होईल असं प्रत्येक शिवसैनिकाला वाटत होतं पण या चार वर्षात सर्व उलट झालं शहर हे पूर्ण गचाळ सर्व कडे प्रचंड घाणीचं साम्राज्य पसरलं तीन वर्षापासून अत्यंत दूषित असं पाणी श्रीरामपूर आतील जनता पिता हे अनेक भागातील लोकांनी आपले नळ कनेक्शन बंद केले आहेत शहर हे जणू एक मोठी कचराकुंडीत झाली की काय असे चित्र आज शहरात निर्माण झाले आहे दहा दिवस कचरा उचलला कोणतीही कचऱ्याची गाडी येत नाही, नवीन एकही काम शहरात झालेले नाही उलट ज्या वेळी मागील सत्ताबदल झाला त्यावेळेस ज्यांनी नगराध्यक्ष ताई यांना मदत केली असे शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे आणि युवा नेते सिद्धार्थ जी मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नगरपालिका चालवली असती तर आज शहराचे चित्र निश्चितच वेगळं असतं पण याउलट त्यांनी काँग्रेसचे बारा जण आपल्या साथीला घेऊन कारभार चालवला ज्या लोकांना वैतागून श्रीरामपूर शहरात सत्तेचा बदल झाला त्याच लोकांना बरोबर घेतल्यामुळे शहरातल्या जनतेच्या पोटी परत निराशा आली व त्या लोकांनी पुन्हा चुकीचे मार्गदर्शन करून शहराचं वाटोळं करण्यास हातभार लावला याउलट नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी यांनी त्यांना ज्यांनी साथ दिली ते सर्व रस्त्यावर काम करणारे होते त्यांच्या साथीने कारभार चालवला असता तर शहरातही एक चांगला संदेश गेला असता व हे सर्व लोक शहराच्या विकासासाठी दिवस-रात्र झटणारे होते पण त्यांना बाजूला करून भलत्याच लोकांना बरोबर घेऊन काम केल्याने आज शहराचे पूर्ण वाटोळे झाले आहेत वास्तविक जे लोक गट बदलून आपल्याकडे आले होते ते सर्व स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते ते त्यांच्या बरोबर प्रामाणिक राहिले नाही तर ते आपल्या बरोबर काय राहतील याचा ही विचार नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांनी केला नाही त्यामुळे चार वर्षे जनतेला हाल भोगावे लागले त्याची आम्ही जनतेकडे माफी मागतो व पुढील वर्षी येणाऱ्या निवडणुकीत एक चांगला सक्षम पर्याय म्हणून शिवसेना नव्या उमेदीने सर्व ताकतीची उमेदवार उभे करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या दूरदृष्टीने जे महाराष्ट्रभर विकासाची कामे चाललेली आहे ते सर्व नवीन स्वरूपाचे प्रोजेक्ट श्रीरामपूर शहरात आणण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी श्रीरामपूर तील सुज्ञ जनतेने पण यावेळेस शिवसेनेचे धनुष्यबाण जास्तीत जास्त आपल्या भागातून नगरपालिकेत पाठवावे असे सुद्धा आव्हान युवा सेनेचे शहरप्रमुख निखिल पवार यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here