श्रीरामपूर/प्रतिनिधी :- तालुक्‍यातील बेलापूर येथील एक प्रसिद्ध व्यापारी गौतम झुंबरलाळलाल हिरण (वय ५०) हे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचे अपहरण झाल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील अपहरण झालेल्या व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह आज कुजलेल्या अवस्थेत वाकडी शिवारात आढळला आहे.

बेलापूर येथील व्यावसायिक गौतम हिरण यांच्या अपहरणाच्या निषेधार्थ बेलापूर बंद ठेवण्यात आले होते. अपहरणाचा तपास लागत नसल्याने लोकांमधून तीव्र संताप व्यक्त झाला होता. व्यवसायिक हिरण पाच दिवसांपासून बेपत्ता होते पोलीसांना अद्याप त्यांचा तपास लागला नसल्याने अचुक माहिती देणारास एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले. व्यावमायिक आणि ग्रामस्थांनी बेलापुर गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र आज सकाळीच व्यावमायिक गौतम हिरण यांचा मृतदेह आढळून आल्याने श्रीरामपूर तालुक्‍यातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here