अहमदनगर :- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या गळाला लागला आहे. हैद्राबादेतून शुक्रवारी त्यास ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहीती असून आज शनिवारी सकाळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अतिशय नियोजबद्ध पद्धतीने बोठे याने जरे यांच्या हत्येचा कट रचला होता. मात्र पोलिस तपासात बोठेचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्याचा पैसा तसेच पोलिस दलातील असलेला त्याचा दबदबा कामाला आला नाही. सर्व फासे उलटे पडू लागल्याने हतबल झालेला बाळ अखेर पोलिसांच्या गळाला लागला. दरम्यान, बोठे यास अटक करण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

अशी झाली अटक :- बाळ बोठे तीन ठिकाणी गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता, आज सकाळी सहा वाजता त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे बाळ बोठे ह्याला ज्या हॉटेल मधून अटक केली त्या हॉटेल मधील त्याच्या रूमला चक्क बाहेरून कुलूप लावले होते. त्याला सहारा देणारे जनार्धन अतुले हे वकील व चार जणांना ही बाळ बोठे सोबत अटक केली आहे.

ह्या कारणामुळे केली हत्या :- माझी बदनामी होईल का व रेखा जरे माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करतील का ह्या एका कारणावरून बाळ बोठे याने रेखा जरे यांची हत्या केल्याचे स्पष्टीकरण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here