श्रीरामपूर(प्रतिनिधी)- लोकशाही सुदृढ करण्यासाठी युवक पिढीचे मतदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी प्रभागातील मतदार ट्रान्सफर व नवीन नोंदणी अभियान शुभारंभाप्रसंगी केले. यावेळी व्ही.टी.पाटील, भागवत लासुरे, नाना पाटील, गणपत कोल्हे, संतोष कासलीवाल, विश्वनाथ गाढे, मनोज ओझा, सचिन ढवळे, विवेक तांबे, राहुल पटारे, तुषार चांडवले, किशोर झिंजाड, रघुराम शेट्टी, राजेश पटेल, राहुल रुपनर आदी उपस्थित होते.
परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते फित कापून नवीन मतदार नोंदणीची सुरवात करण्यात आली. यावेळी बोलताना मोरयाचे अध्यक्ष केतन खोरे म्हणाले की, श्रीरामपूर तालुक्यातील मतदार नोंदणीची बीएलओ यंत्रणा कार्यान्वित नसल्याने नागरिकांना मतदार नोंदणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अभियानामुळे प्रभागातील नागरिकांची धावपळ थांबल्याचे ते म्हणाले. चांगल्या विचारांच्या लोकप्रतिनिधींना निवडून देण्यात युवक पिढीचा मोलाचा वाटा असतो. विशिष्ट लोकांची राजकारणातील वर्षानुवर्षे सुरू असलेली मक्तेदारी संपून काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन खोरे यांनी केले.
प्रभागातील अनेक नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, ट्रान्सफर कॅम्पचा लाभ घेतला. यावेळी ज्येष्ठ नागरिक बबन तागड, आबासाहेब साबळे, निलेश उबाळे, इरफान शेख, अनिकेत गायकवाड, गणेश मगरे, हर्षल गौड, प्रीतम पासवान, चिन्मय गोरे, बाळासाहेब ढेरंगे, रुपाली लोढा, मानसीकौर भटियानी, प्रकाश घुले, वसीम शेख, कचरू चोथवे, सुशांत कुलकर्णी, विवेक मुगळीकर, नानासाहेब तांबे, गणेश होते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here