श्रीरामपूर/प्रतिनिधी :- तालुक्यातील वांगी-भेर्डापूर येथील प्राईड अकॅडमी इंग्लिश मेडीअम स्कूल व ज्युनिअर कॉलेज याठिकाणी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांसोबत सर्व विद्यार्थ्यांना मास्कचे वितरण करण्यात आले.

माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक माऊली मुरकुटे व प्राईड अॅकेडमी संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राईड अकॅडमी येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कारेगाव येथील सिंधुताई रमेश उंडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी होत्या तसेच कोटक महिंद्रा श्रीरामपूरचे मॅनेजर लक्ष्मण कसबे व एक्झिक्युटिव्ह मॅनेजर श्रीकांत जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, महिलांना समाजात स्वाभिमानाने जगून दाखविणाऱ्या श्रीमती प्रमिला साहेबराव उंडे तसेच घरघुती व्यवसाय करणाऱ्या मनीषा कसबे, पाथरे येथील प्राईड अकॅडमी विद्यार्थिनीच्या आजी रतनबाई घोडके अश्या कर्तुत्ववान महिलांच्या उपस्थितीत महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.


श्री. कसबे यांनी आपल्या भाषणात स्त्रीचे आपल्या आयुष्यात किती महत्व आहे याबद्दल विचार मांडले.महिलांना सन्मान दिला तर कुटुंबाची प्रगती होते व मुली या उद्याच्या जबाबदार नागरिक असल्याने त्यांची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी कारेगाव येथील प्रमिला उंडे यांनी बहिणाबाई चौधरी यांची कविता गावून सर्वांचे मन जिंकून घेतले. कुटुंब, शेती, नातेसंबंध व राजकारण या सर्वांमधून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सिंधुताई उंडे यांनी महिलांना व विद्यार्थ्यांना कुठेही खचून न जाता पुढे जात राहण्याचा मंत्र दिला. हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल त्यांनी प्राचार्यांचे मनापासून आभार मानले.

सदर कार्यक्रमाचे प्रस्थाविक प्राचार्या प्रीती गोटे यांनी केले. विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी महिला दिनाविषयी आपले मनोगत मांडले. याप्रसंगी उप.प्राचार्य सुरेश कोकणे, प्राध्या. राजेंद्र गुजर, महेश शिंदे, प्रशांत जाधव, अस्मिता देवरे, सुमैया शेख, पूजा पवार, अश्विनी जगताप, सुनिता कवडे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक हे श्वेता भिंगारदिवे व मंजुषा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमानंतर मुलींसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामभाऊ ठोसर, योगेश औटी, किशोर नवले, प्रकाश पारखे, नवनाथ भांड, मुकुंद अहिरे, शाहरुख पठाण यांचे योगदान लाभले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here