श्रीरामपूर(वार्ताहर)- प्रभाग १० मध्ये वार्ड न. २ मध्ये विकास कामांनी गती घेतली आहे. अविकसीत भाग हा शिक्का जो वार्ड न.२ वर बसलेला आहे. तो शिक्का पुसण्याची जबाबदारी माझी आहे .या भागाचा आता सर्वांगिन विकास करणार असे प्रतिपादन नगराध्यक्षश अनुराधाताई आदिक यांनी केले.

नगरपालिकेच्यावतीने प्रभाग १० मध्ये सुमारे २६ लक्ष रुपयाचे विविध कामे रस्ते खडीकरण व डांबीरकरण कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रभागातील नगरसेविका जायदाबा कलीम कुरेशी, कलीम कुरेशी, ज्येष्ठ नगरसेवक मुक्ताहर शाह, प्रकाश ढोकणे, रईस जहागिरदार, अकीलभाई शेख, अलतमश पटेल, गनीभाई टिनवाले, समीर बागवाण, तौफिक शेख,राष्ट्रवादी कॉग्रेसचे अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस सोहेल शेख, सैफ शेख , तहेकुब कुरेशी, बदरुदिन पिरजादे, जलाऊदिन पिरजांदे,रज्जाक पठाण,अन्सारी, हरुन कुरेशी, हरुन टेलर, इनुस कुरेशी,निसार सदाबाडे, महमुद टेलर, मुज्जुबखर कसाई, मुस्ताक शेख,शफी शाह आदि उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाले की, स्वर्गिय खासदार गोqवदराव आदिक साहेबावर वार्ड न.२ मधिल जनतेने प्रचंड प्रेम केलेले आहे. साहेबाच्या पावलावर मार्गक्रमण करुण येथील जनतेचे जास्तित जास्त प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे.

यावेळी आदिक म्हणाले की, येथील गटारीची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडिवण्यासाठी योग्य त्या उपाय योजना केलेल्या आहेत. प्रास्तविक कलीम कुरेशी यांनी केले आभार नगरसेवक मुक्ताहर शाह यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here