नेवासा :- ऊस तोड कामगाराकडून (रा. कन्नड जि. औरंगाबाद) १० हजार रुपयांची लाच घेताना नेवासा पोलीस ठाण्याचा कर्मचारी सोमनाथ अशोक कुंढारे (वय. ३३) याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार यांचे नातेवाईक मोटर अपघातात मयत झाले होते. त्याबाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. सदर मयत व्यक्तीच्याबाबतचे पीएम रिपोर्ट आणि पंचनाम्याची प्रत मिळावी, यासाठी पोलीस कर्मचारी कुंढारे याने तक्रारदाराकडे दिनांक १६/०३/२०२१ रोजी १५ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली आणि लाचेची रक्कम दिनांक १७/०३/२०२१ रोजी नेवासा पोलीस स्टेशन येथे स्वीकारली. याप्रकरणी

सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, निलेश सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, विजय जाधव, पोलीस उपअधीक्षक, नाशिक लाप्रवि यांच्या मार्गदर्शनाखाली उज्ज्वलकुमार व्ही पाटील, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि, नाशिक, सह अधिकारी चंद्रसेन पालकर, पो. नि ला.प्र.वि नाशिक, सापळा पथक – पो हवा दीपक कुशारे, पो हवा सचिन गोसावी, पोना एकनाथ बाविस्कर, चालक पो.शि. जाधव लाप्रवि नाशिक यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here