लोणी/प्रतिनिधी :- येथील इरिगेशन परिसरात आढळलेल्या मृतदेहाच्या घटनेचा केवळ तीन तासात छडा लावण्यात पोलिसांना यश
याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक १६/०३/२०२१ रोजी रात्री 0८.00 वाजण्याचे सुमारास लोणी खुर्द ता.राहाता येथील एरिकेशन बंगल्याजवळ पाटाचे कडेला एक अज्ञात २० वर्ष वयोगटातील मुलास डोक्यात दगड घालुन क्रुरतेने जिवे ठार मारले असुन त्याचे प्रेत हे पाटाचे कडेला पडलेले आहे. बाबत फोन आल्याने तात्काळ लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी घटनास्थळी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी एक अंदाजे २० वर्ष वयोगटातील पुरुष जातीचे प्रेत हे रक्ताचे थारोळ्यात पडलेले मिळुन आले. सदर ठिकाणी आरोपीने कुठल्याही पुरावा ठेवला नसतानाही पो.हे.कॉ राजेंद्र औटी यांना मिळालेल्या गुप्त बातमीमार्फत सदरचा मृत व्यक्ती हा अर्जुन अनिल पवार वय २० वर्ष रा.बारागाव नांदुर ता.राहुरी असे असलेबाबत निष्पन्न करुन त्याचे नातेवाईकांना संपर्क करुन मयताचा मेहुना गोरख अशोक बर्डे वय ३१ वर्ष धंदा मजुरी रा.राहुरी खुर्द भिल्लहाटी ता.राहुरी जिल्हा अहमदनगर याचे फिर्यादीवरुन लोणी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं.१००/२०२१ भा.द.वि.कलम 302, 120 (ब),34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हेचे गांभीर्या लक्षात घेता मा.मनोज पाटील पोलीस अधिक्षक सो अहमदनगर डॉ.दिपाली काळे मँडम अप्पर पोलीस अधिक्षक सो श्रीरामपुर, श्री.संजय सातव सो उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील ,पोलिस उपनिरीक्षक नाना सुर्यवंशी, यांनी तपास पथक तयार करुन पोहेकॉ राजेंद्र औटी यांना मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन सायबर सेल श्रीरामपुर पो.ना फुरखान शेख यांचे मदतीने सदर गुन्ह्यातील आरोपींना राहुरी फॅक्टरी ते देवळाली रोडवर आरोपींचा पाठलाग करुन मोठ्या शिताफीने आरोपी नामे १) भिवा उर्फ विठ्ठल कैलास कावळे वय 22 वर्ष 2) दिपक विजय डोळस वय 20 वर्ष दोघे रा. राहुरी खुर्द ता.राहुरी यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगीरी ही लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील, पोसई सुर्यवंशी,पोहेकॉ राजेंद्र औटी,
पोहेकॉ सुरेश पवार, पो.ना.दिपक रोकडे, पोना.सांगळे, पो.ना दहीफळे पोना तमनर, पोना भिंगारदिवे,पोकॉ
शिवाजी न-हे,पो.कॉ. सोमनाथ वडणे पो.कॉ मनोज सनानसे सायबर सेलचे पो.ना फुरखान शेख यांनी
केलेली आहे.