श्रीरामपूर/प्रतिनिधी :- तालुक्यातीला खैरी निमगाव शिवारात, १९ मार्च रोजी एका १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलंय, यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यास मिळालेल्या माहितीवरून, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, व डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुक्यातील खैरी निमगाव शिवारात असलेल्या एका पोल्ट्री फार्मवर, तालुका पोलिस ठाण्याचे एक पथक दाखल झाले, त्यावेळी अल्पवयीन पीडित मुलीची विचारपूस, तसेच पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून, तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं ५७/२०२१ भा द वी कलम ३७६ अ, ब, क, तसेच बालकाचे लैंगिक छळापासून सौरक्षण कायदा कलम ३,४,६ कलमान्वये, गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी नराधमास पोलिसांनी अटक केली असून, आरोपीस न्यायालयात हजर केले असता, आरोपीस ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे यांनी दिलीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here