रांजणखोल/प्रतिनिधी(भाऊसाहेब जाधव)- गावातील विकासकामांची नाळ जोडत व ती मजबूत करण्यात यश येताच ते समाजाचे सेवेकरी बनले त्यांच्या नेतृत्वाखाली गावाने मोठी मजल मारली मुळा प्रवरेचे जेष्ठ संचालक अंबादास पाटील ढोकचौळे यांच्या नेतृत्वाखाली रांजणखोल ग्रामपंचायतीचा कारभार सुरु आहे

लोकनियुकत सरपंच चांगदेव ढोकचौळे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विकासाची गंगा आणली. नियोजनबद्ध पद्धतीने या गावचा होत असलेला विकास व बदललेलं रूप कौतुकास्पद असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांनी घेतलेली उडी यशाचा राजमार्ग दाखवणारी ठरली गावात विकासगंगा अवतरू लागली. गावातील सर्व मुख्य रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात आले. उर्वरित रस्त्यांचे काम सुरू आहेत. बंदिस्त गटार योजना पूर्णत्वास गेली. नळ पाणी पुरवठा व्यवस्थित पद्धतीने चालु आहे पाण्याची उधळपट्टी व अपव्यय थांबला

गावासह वस्त्यांकडे असलेल्या मार्गांवर एलईडी पथदिवे बसवण्यात आले काँक्रिटीकरणाची कामे गावात झाली आहेत गावात लाखो रूपये खर्चाचे शुद्ध पाण्याचे सेन्सर सिस्टिमचे यंत्र बसवल्याने अवघ्या पाच रूपयांत २० लिटर शुदध पाणी उपलब्ध झाले आहे तसेच पथदिवे बसवण्यात आल्याने प्रकाशवाट उजळली आहे

राहाता तालुक्यातील रांजणखोल हे गाव उपक्रमशील गाव म्हणून पुढे आले आहे दहा हजारांच्या आत लोकसंख्येच्या या गावातील सरपंच चांगदेव ढोकचौळे यांनी आर्थिक नियोजन व निधीचे योग्य व्यवस्थापन केले. त्यातून आरोग्य स्वच्छता, गाव सुशोभीकरण, महिलांचे सक्षमीकरण, मंदिरे, शाळांना सुविधा, मंदिर उभारणी आदी विविध बाबींमधून विकासाची कामे यशस्वी मार्गी लावली आहेत

माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पाटील,खा.सुजय विखे पाटील,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटिल व मुळा प्रवरेचे जेष्ठ संचालक अंबादास पाटील ढोकचौळे यांच्यामुळे विकासाची कामे व अर्थकारणाला बळ मिळाले. गावचे सरपंच चांगदेव ढोकचौळे यांनी पुढाकार घेवुन कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबवीत गावासाठी पाण्याची सोय केली पाणीदार गाव म्हणुन रांजणखोल गावाची ओळख होवु लागली शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्त कामे करण्याचे कसब पाहायचे असेल तर रांजणखोल गावाचे उदाहरण दिशादर्शक ठरेल सरपंच ढोकचौळे स्वताः विकासकामांवर बारकाईने लक्ष ठेवुन आहे

रस्त्यांचे डांबरीकरणप्रमुख मार्गांवर दुतर्फा विविध शोभेची सावली देणारी झाडे लावण्यात आली आहे ग्रामपंचायत कार्यालयाची आकर्षक वास्तू बांधली आहे गावात महत्त्वाच्या ठिकाणी विशेषतः जिल्हा परिषद शाळेत सीसीटीव्ही बसविले आहेत गावचे सुशोभीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुख्य ठिकाणी पेव्हींग ब्लॉक्स, विविध वस्त्यांना जोडणारे साकव बसविले जाणार आहेत अस्वच्छता दिसणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे

सांडपाणी व्यवस्थापनासाठी बंदिस्त गटारी, सांडपाण्याची व्यवस्था, घनकचरा वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहन, शाळेचे क्रीडांगण, सी.सी टिवी कॅमेरे, शंभर टक्के शौचालयाचा वापर अंगणवाड्यांचे पालटलेले रूप आगी गोष्टीही विकासात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत गावातील कामांचे नियोजन माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रस्ताव दिला की तातडीने त्यास मंजुरी मिळायची त्यामुळे विकासकामासाठी निधी कमी पडला नाही असे सरपंच चांगदेव ढोकचौळे यांनी सांगितले
 
महिलांना घरबसल्या रोजगार मिळावा यासाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षणांचे सातत्याने आयोजन होते गरोदर मातांनाही आरोग्य उपकेंद्र येथे मार्गदर्शन करण्यात येते त्यांच्या आरोग्यासाठी विविध प्रकारचं शिबिरे आयोजित केली जातात प्राथमिक शाळेमध्ये इ लर्निंग सेवेसाठी संगणक देण्यात आले आहेत

सरपंच चांगदेव ढोकचौळे यांनी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना बरोबर घेवुन केला गावातील विविध विकासांची कामे करुन गावाचा कायापालट केला आहे आहे गावाला आदर्श गाव म्हणुन नावारुपाला आणले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here