नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद)– नेवासा शहरात वीज चोरी करणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्यात आले. मीटरच्या मागच्या बाजूला मॅगनेट चिटकून व आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या नेवाशाच्या चौघांविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे.

शिवशक्ती आईस्क्रीमचे रघुनाथ गोकुळ गुजर, सुरेश भगवानलाला गुजर (दोघे रा.नेवासा).न्यू पारिजात हॉटेलचे बाळासाहेब एकनाथ साळुंके, शुभमबाळासाहेब साळुके (दोघे रा. नगर रोड, नेवासा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिरत्या पथकाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता प्रवीण भीमराज पाटील (वय ३४ रा. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. रघुनाथ गुजर व सुरेश गुजर यांनी २७ जानेवारी २०२१ च्या पुर्वी २४ महिन्यांपासून शिवशक्ती आईस्क्रीमसाठी वीज पुरवठा करणाऱ्या’ मीटरच्यापाठीमागील बाजूला मॅगनेट लावून ६ लाख ९७ हजार ४० किंमतीची ४१ हजार १८९ युनिट वीज चोरी करून महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केले असल्याचे प्रवीण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दुसरी फिर्याद बाळासाहेब साळुंके व शुभम साळुंके या पिता-पुत्रा विरुद्ध दिली आहे. साळुंके पिता-पुत्र न्यू पारिजात हॉटेलसाठी २७ जानेवारी २०२१ च्या पूर्वी सहा महिन्यांपासून आकडा टाकून चोरून वीज घेतहोते. त्यांनी २८ हजार ६६० रुपये किंमतीची १ हजार ५१२ युनिट वीज चोरून महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याचे पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस नाईक घोडके करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here