नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) – कहार कर्मचारी समाज सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य च्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबादेवी मंदिर नेवासा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमास मुंबादेवी मंदिराचे ब्रहस्पतीनाथ जी महाराज, कहार कर्मचारी समाज सेवा ट्रस्ट च्या उपाध्यक्ष सौ स्मिता ताई तुंबारे, श्रीमती भारती गव्हाणे, श्रीमती अनिता पंडोरे, कांचन पंडोरे, काजल भंडारे, सविता भंडारे, कैलास कुंढारे, कृष्णा डहाळे, राजेंद्र मापारी, किशोर जराड, महेश गंगुले तसेच कुणाल सरगैय्ये यांनी मोलाचे योगदान दिले.यावेळी अनेक समाज बांधवांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. सर्व रक्तदान करणाऱ्यांना आनंदऋषी हॉस्पिटल रक्तपेढी मार्फत प्रमाणपत्र देण्यात आले.हे शिबीर आनंदऋषी हॉस्पिटल येथील रक्तपेढी मार्फत हाताळण्यात आले. त्यासाठी डॉ.शंकर मोरे, सुनिल महानोर, संदीप भोसले, सुरेखा पालवे, निशाह शेख, यांच्या मदतीने पार पडले. सर्व रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांचे कहार कर्मचारी समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री.संतोषभाऊ पंडूरे यांनी आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here