नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) – मंत्री शंकरराव गडाख यांच्या जनसंपर्क कार्यालयात वाचन कट्टा सुरु करण्यात आला.

नेवासा येथील नामदार शंकरराव गडाख यांच्या जनसंपर्क कार्यालयात जेष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख व प्रशांतभाऊ गडाख यांच्या कडून प्रेरणा घेऊन शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या वाचन कट्ट्याचे उदघाटन पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या हस्ते करण्यात आले. वाचनामुळे लिखानातील विश्लेषण कौशल्य वाढीस लागते त्याच बरोबर विचार व ज्ञानात ही मोठी वृद्धी होते असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी झालेल्या उदघाटन प्रसंगी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,मार्केट कमिटीचे संचालक राजाराम फोफसे,पोपटराव जिरे, सुनील धायजे, सुधीर बोरकर,पंकज जेधे,सतीश चुत्तर, नामदार गडाख यांचे स्वीय सहायक सुनील जाधव,विशाल सुरडे,अन्सार शेख,उमाकांत जामदार, नितीन ढवळे,संतोष राजगिरे उपस्थित होते.

नामदार शंकरराव गडाख कार्यालयाचे प्रमुख सुनील जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले पत्रकार सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.वाचन कट्टयासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल लघु व्यावसायिक विशाल सुरडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक विजय करे म्हणाले की नामदार शंकरराव गडाख साहेबांच्या कार्यालयात हा वाचन कट्टा सुरू होतो हा चांगला उपक्रम आहे त्यास मी शुभेच्छा देतो आज वाचनाची फारच गरज आहे वाचनामुळे जगात काय चालले ते समजते तर माणसाचे विचार बदलून त्यांच्या ज्ञानात ही भर पडते सर्वांनी पुस्तके दैनिक वाचून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी गती दयावी असे आवाहन केले.

मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर म्हणाले की नेवासा तालुक्यात जेष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी वाचन संस्कृती रुजविली त्यात भर घालण्याचे काम प्रशांतभाऊ गडाख हे करत आहे. त्यामुळे नेवासा तालुका वाचनात आघाडीवर असल्याचे सांगून वाचन कट्टयाला शुभेच्छा दिल्या. सुनील जाधव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here