श्रीरामपुर/प्रतिनिधी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात सामील होण्यासाठी सभासद नोंदणी अभियान सुरू झालेली आहे. इच्छुकानी मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावे असे आव्हान मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी केले आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सभासद नोंदणी अभियान हाती घेतले आहे. राजसाहेब ठाकरे मनसे अध्यक्ष यांच्या यांच्या हस्ते मुंबई येतील दादर शिवाजी पार्क येथे सभासद नोंदणीला सुरूवात करण्यात आलेली आहे.

अ.नगर जिल्ह्यात श्रीरामपुर तालुक्यात मनसे संपर्क कार्यलयात श्रीरामपूर बस स्टँड शेजारी हॉटेल निलायम रोड गाळा नंबर १७ या ठिकाणी सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी व येताने पासपोर्ट साईज चा फोटो घेऊन येणे असे आव्हान बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष
यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here