श्रीरामपुर/प्रतिनिधी :- गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा, अशी मागणी शहरातील प्रेमींसह असंख्य नागरीक करीत आहेत, मात्र अनेक सत्तांतर होऊन देखील, छत्रपतींचा पुतळा काही लागला नाही, पालिका निवडणूक असो, की विधानसभा – लोकसभा, जेव्हा निवडणूक आल्या की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळया संदर्भातील चर्चेला उधाण येते,

केवळ राजकारणासाठी महाराजांच्या पुतळ्याचे भांडवल करणारे, आणि खोटे आश्वासन देणाऱ्या लोकांमुळे त्रस्त झालेल्या, शहरातील ७ शिवप्रेमींनी एकत्र येऊन, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पहाटे, थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविला, त्यामुळे पहाटेच्या पोलीस आणि पालिका प्रशासनाची झोप उडाली, यावेळी पोलीस निरीक्षक सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी, शिवाप्रहार संघटनेच्या ७ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन, त्यांच्या विरुद्ध भदवी कलम ३४१, ४४७,१४३,१४९,१८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसविण्यात आलेला पुतळा, अनाधिकृत पद्धतीने बसविण्यात असल्याने, पोलिसांनी सदर पुतळा सुरक्षित ठिकाणी हालविल्याची माहिती, पोलीस सूत्रांनी दिलीय

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here