मा.उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय सभापती संगिता शिंदे यांची याचिका फेटाळली.

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- या बाबत माहिती अशी कि ,जिल्हाधिकारी अहमदनगर ‍दि. ६ जानेवारी २०२० डॉ. वंदना मुरकुटे यांची भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस श्रीरामपूर, गटनेते पदाच्या मान्यता देण्याच्या आदेशास आव्हान देणारी पंचायत समिती सभापती संगिता शिंदे यांनी दाखल केलली याचिका उच्च न्यायालय, खंडपिठ औरंगाबाद यांनी नुकतीच फेटाळली असून सदरचा निकाल महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सभासद अपात्रता कायदे अंतर्गत सदस्य अपात्रतेच्या प्रकारणामध्ये दिशादर्शक ठरणारा असेल अशी माहिती डॉ. वंदना मुरकुटे यांचे विधिज्ञ ॲड. राहुल करपे यांनी अशी माहिती दिली.

श्रीरामपूर पंचायत समिती २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे शिंदे व मुरकुटे यांचेसह एकूण चार सदस्य निवडूण आले होते. व विराधी अपक्ष चार सदस्य निवडूण आलेले होते. अपक्ष सदस्यांनी मिळून “श्रीरामपूर तालुका विकास महाआघाडी” हा स्वतंत्र गट स्थापन करुन दिपक शिवराम पटारे यांची गटनेते पदी निवड केली. तसेच दि. ६ मार्च २०१७ च्या सभेत श्रीमती संगिता शिंदे यांची एक मताने भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी श्रीरामपूर पंचायत समिती गट नेते पदीनिवड करण्यात येवून त्याची नोंद घटनेसह जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यलयात करण्यात आली.

दरम्यानच्या काळात गटनेत्या संगिता शिंदे या पक्षविरोधी कार्यवाही करतात, सभा बोलवत नाही, हे पक्षाच्या दृष्टीने घातक असल्याकारणाने कॉग्रेस पक्षाच्या तीन सदस्यांनी दिलेल्या अर्जावरुन भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी ४ जानेवारी २०२० रोजी पंचायत समिती पार्टीच्या बोलावलेल्या सभेत ४ पैकी ३ सदस्यांनी डॉ. वंदना मुरकुटे यांची गटनेतेपदी निवड करुन तसा अहवाल व अर्ज जिल्हाधिकारी यांचेकडे दिल्यावर जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी डॉ. मुरकुटे यांची गटनेते पदी झालेल्या निवडीस मान्यता दिली.

डॉ. वंदना मुरकुटे यांनी जारी केलेल्या व्हीप चे श्रीमती शिंदे यांनी उल्लघन करुन विरोधी गटाशी हात मिळवणी करुन दि. ७ जानेवारी २०२० रोजी झालेल्या निवडणूकीत पंचायत समिती सभापती म्हणून निवडून आल्या. श्रीमती संगिता शिंदे यांनी व्हीप चे उल्लघन केल्याने डॉ. वंदना मुरकुटे यांनी गटनेत्या म्हणून श्रीमती संगिता शिंदे यांना पंचायत समिती सदस्य अपात्र करावे याकरिता जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कडे अर्ज दाखल केला तसेच संगिता शिंदे यांनी देखील डॉ. वंदना मुरकुटे व इतर कॉग्रेस पार्टीच्या दोन पंचायत समिती सदस्यांना व्हीप उल्लघन केले म्हणून या तीनही सदस्यांना अपात्र करावे,सदरचे दोनही अर्ज जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे प्रलंबित असतांना श्रीमती संगिता शिंदे यांनी मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करुन डॉ. वंदना मुरकुटे यांना गटनेत्या म्हणून मान्यता देण्याच्या जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या दि. ६ जानेवारी २०२०च्या आदेशास आव्हान देवून उपरोक्त अपात्रतेच्या कार्यवाहीस स्थगिती मिळविली त्या नंतर उच्च न्यायालय येथे संगिता शिंदे यांनी बाजू मांडली. घटनेनुसार पाच वर्ष गटनेत्या आहेत, तसेच घटनेत दुरुस्ती करुन गटनेत्या बदल करण्याच्या बाबतीत दुरुस्ती केल्या शिवाय गटनेता बदल करता येत नाही.तसेच कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दि. ४ जानेवारी २०२० रोजी बोलावलेली सभा अनाधिकृत होती.व याच बरोबर इतर मुदयांवर भर देण्यात आला, याउलट डॉ. वंदना मुरकुटे यांचे वतीने बाजू मांडण्यात आली की घटनेत कुठेही गट नेत्या पाच वर्षात बदल करता येत नाही अशी तरतुद नाही. तसेच सार्वत्रिक निवडूकानंतर तत्कालीन भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिवंगत जयंतराव ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दि. १ मार्च २०१७ च्या सभेत विषय क्रमांक ३ नुसार गटनेत्या पदाबाबत बदल करावयाचा झाल्यास कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सभा बोलावतील असा ठराव मंजूर मंजूर करण्यात आला होता. त्या सभेत श्रीमती संगिता शिंदे उपस्थीत होत्या. तसेच घटनेत गटनेत्या विशिष्ट काळाची मुदत नसल्यास लोकशाही मार्गाने गटनेता बदल करता येतात, असे मुद्दे उपस्थीत करण्यात आले.

सर्व बाबींचा उहापोह करुन व म्हणणे लक्षात घेवून मा. उच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदविला की, गटनेता पुर्णकाळ राहील अशी तरतुद नाही. तसेच ज्या गटाने श्रीमती संगिता शिंदे यांना गटनेता म्हणून निवडले त्याच गटाने डॉ. वंदना मुरकुटे यांची गटनेता म्हणून निवड केली. पर्यायाने जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी डॉ. वंदना मुरकुटे गटनेता म्हणून दिलेला आदेश योग्य असून त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही म्हणून श्रीमती संगिता शिंदे यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. डॉ.वंदना मुरकुटे यांचे वतीने वेळोवेळी ॲड. राहुल करपे व सहकारी ॲड.योगेश शिंदे औरंगाबाद यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here