स्पर्धेत१२ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंनी नोंदवला सहभाग

श्रीरामपूर/प्रतिनिधी (गौरव डेंगळे) – १५ मार्च पासून सुरु असणाऱ्या राष्ट्रीय टी-ट्वेंटी भाग्यविधाता चषकचा अंतिम सामन्यात आज साईदीप हिरोज अहमदनगर संघाने अलीम एंटरप्राइजेस गंगापुर संघाचा ६ गडी राखून पराभव करीत भाग्यविधाता चषक पटकावला.
आज सकाळी ११:०० वाजता अंतिम सामन्याची नाणेफेक श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री करण ससाणे, श्री सचिन गुजर, नगरसेवक श्री श्रीनिवास बिहाणी, श्री मुज्जर शेख, श्री राहूल शिपी,श्री अल्ताफ पठाण, श्री मुन्नाभाई पठाण, श्री बाबासाहेब दिघे,श्री प्रेमचंद कुंकुलोल, श्री सलिम जागीरदार, श्री सलमान शेख आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडली.
अलीम एंटरप्राइजेस गंगापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. फरीद नजमी याच्या ४३ धावा व रणजी खेळाडू नदीम अन्सारी यांच्या ३५ धावांच्या जोरावर गंगापूर संघाने निर्धारित २० षटकात ८ गडी बाद १६१ धावा फटकावल्या. नगर संघाकडून प्रदीप जगदाळे व यासर शेख यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.विजयासाठी १६२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नगर संघाने विजयी लक्ष १६व्या षटकात ४ गडी गमावून पार केले. नगर संघाकडून राज्य खेळाडू खालिद जमान याने ४८ धावा,संदीप आडोळे नाबाद ३९ धावा तर प्रदीप जगदाळे यांनी २४ धावाचे योगदान दिले. गंगापूर संघकडून नदीम व इम्रान यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले. २४ धावा व ३ गडी बाद करणारा प्रदीप जगदाळे याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेता संघ साईदीप हिरोज अहमदनगर संघाला रुपये १,०००००/-( लाख) व चषक प्रदान करण्यात आला. उपविजेता संघ अलीम एंटरप्राइजेस गंगापूर संघाला रुपये ६५ हजार व चषक, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या शिरसाठ स्पोर्ट्स पुणे संघाला रुपये ४५ हजार व चषक तर चतुर्थ क्रमांक पटकावणाऱ्या संगमनेर संघाला रुपये २५ हजार व चषक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.१५ दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशभरातून १६ नामांकित संघाने सहभाग नोंदवला होता. यामध्ये भारतीय अ संघाकडून खेळलेला अक्षय दरेकर तर रणजी स्पर्धा खेळणारे खेळाडू खालिद झमान, केनिया अ संघाकडून खेळलेला संदीप आडोळे ,प्रमोद वाघ,सुजित उबाळे,यश यादव,अझर अन्सारी ऋषी पवार, कंबोडिया प्रीमियर लीग घेणारा खेळाडू अनु दुबे यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी खास औरंगाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पंच श्री बळवंत चव्हाण व बाळासाहेब चौधरी यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट अशी पंचगिरी केली. आयोजन समितीचे प्रमुख पप्पू मलिक यांच्या नेतृत्वाखाली अकबर सय्यद,अन्वर शेख,मुनव्वर सय्यद,बाबा शेख आदींनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अधिक परिश्रम घेतले.


ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ बघता यावा म्हणून मी रणजी खेळाडूंना संघात स्थान देतो. याने ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळते व त्यांचे क्रिकेट देखील सुधारते – मेजर श्री संदीप घोडके (संघमालक साईदीप हिरोज अहमदनगर)

अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धा ४०-४० षटकांच्या व्हाव्यात. तसेच १९ वर्षाखालील सर्व सामने हे ४०-४० षटकांचे असावे. १४/१६/१९ गटातील खेळाडूंसाठी जास्तीत जास्त सराव सामने आयोजित करावेत. – संदीप आडोळे (केनिया अ संघाचा खेळाडू व महाराष्ट्र राज्य खेळाडू)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here