नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) – नगर – औरंगाबाद महामार्ग जोडला जाणार नेवासेफाटा ते श्रीरामपूर मार्गे नगर – मनमाड महामार्गाला. श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांच्या पाठपुराव्याने नेवासेफाटा ते श्रीरामपूर रस्त्याचे भाग्य उजाळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामासाठी १२५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून हा मार्ग चौपदरीकरणाचा होणार आहे. ५५ किमी अंतराचा नेवासे, शेवगाव, पाथर्डी सह लगतच्या पैठण, गेवराई तालुक्यांनाही सोयीचा ठरणार आहे.
सद्यस्थितीत नेवासे ते श्रीरामपूर हे ३० किमी.चे अंतर पार करण्यास दिड तासांचा कालावधी लागतो. प्रत्यक्षात एक पदरीच तोही खडडेमय बनलेला हा मार्ग डोकेदूखी ठरत आहे. स्वातंत्रयानंतर झालेल्या पहिल्या डांगरीकरण कामानंतर सतत या मार्गाकडे दूर्लक्षच झाले. मात्र आमदार कानडे यांनी सरकारी दरबारी सातत्याने या कामासाठी पाठपुराव सुरूच ठेवल्याने हा मार्गाच्या आशा पल्लवित झाल्या.या मार्गासाठी प्रारंभी १२५ कोटी तर नंतर पुन्हा नुकतीच १२ कोटी रूपयांची वाढीव मंजूरी मिळालेली आहे. श्रीरामपूरसह नेवासे तालुक्याला या चौपदरी मार्गाचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रधानसचिव अजेय मेह ता यांनी बोलावलेल्या बैठकित या मार्गासाठी आमदार कानडे यांनी निधीची मागणी केली होती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची या कामी मदत झाली त्यांच्यामुळेच या कामी यश आल्याचे आमदार लहू कानडे यांनी सांगितले. नगर औरंगाबाद मार्गावरील नेवासेफाटयापासून हा मार्ग नगर मनमाड मार्गावरील बाभळेश्वरला जोडला जाणार आहे. आमदार लहू कानडे यासाठी केलेले प्रयत्न व मिळवलेला भरघोस निधी नेवासेसह श्रीरामपूर तालुक्याला रहदारी, उद्योग व्यवसायांसाठी लाभदायी ठरणार आहे.

औद्योगिक वसाहतीला चालना हाच हेतू. तालुक्यातून एकही महामार्ग जात नाही त्यामुळे नगर-औरंगाबाद व नगर-मनमाड हे मार्ग जोडल्यास श्रीरामपूरच्या औद्योगिक वसाहतीस चालना मिळेल. रहदारी वाढून फायदा होईल औद्योगिक वसाहत उद्योग भरभराटीला येतील हा हेतू समोर ठेवूनच आपण या कामासाठी पाठपुरावा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शना खाली केला. – आमदार लहू कानडे, श्रीरामपूर.

आमदार कानडे हे उच्च शिक्षित असल्याने जनतेचे प्रश्न सोडवण्याची त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सातत्याने सुरूच असते.नेवासे,श्रीरामपूर सह शिर्डी, शिंगणापूर, नाशिक जाण्यासाठी हा महत्वपूर्ण असा मार्ग ठरणार आहे.श्रीरामपूर तालुक्यात आर्थिकदृष्टया हा मार्ग फायदयाचा ठरेल . – बाळासाहेब तनपुरे ग्रामस्थ भेर्डापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here