श्रीरामपूर- मागील वर्षीच्या लॉकडाऊन मुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचे पूर्णपणे कंबरडे मोडले आहे. असे असताना पुढील काळात मागील व्यवसायाचे नुकसानच अद्याप भरून निघालेली नाही अशा स्थितीत सरकारने 30 एप्रिल पर्यंतचा विषम नियमांवर आधारित लॉकडाउन छोट्या आणि मोठ्या व्यापाऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारा असून या लॉकडाउनच्या अटी, शर्तीं मध्ये प्रशासनाने लवकर शिथीलता न आणल्यास प्रशासनाला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल व व्यापारी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, नगरसेवक किरण लुणीया यांनी दिला आहे
छोट्या व मोठ्या व्यापाऱ्यांचे मागील संपूर्ण वर्ष लॉकडाउनच्या दुष्परिणामांचा सामना करण्यात गेले.अजूनही व्यापार रांकेला आलेला नाहीत असे असताना छोट्या आणि मोठ्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर या पंचवीस दिवसाच्या लॉकडाऊनमुळे कुऱ्हाड कोसळली असून त्यांचे व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत ते व्यवसायाने पुन्हा नव्याने उभारी घ्यावी यासाठी सरकार कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. सरकारने व्यापाऱ्यांना व्यावसायिकदृष्ट्या पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेले आहे
हा अजब गजब लॉकडाऊन आहे .जनतेला रस्त्यावर फिरण्यासाठी पूर्णपणे मोकळीक आहे. प्रवासी वाहतूक चालू आहे. सर्व मालाची वाहतूक चालू आहे. काही दुकाने चालू आणि काही दुकाने बंद चालू असलेल्या दुकानांमध्ये खरेदी करणाऱ्या नागरिकांची रस्त्यावर जाणे चालू आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कुठलाही परिणाम अजब नियमांमुळे दिसून येत नाही त्यामुळे हा व्यापाऱ्यांमध्ये विषमता व असंतोष पसरवणारा व करोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी कुठलीही मदत न करणारा लॉकडाऊन आहे असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे प्रत्यक्ष नागरिकांना संचारबंदी लागू केल्याशिवाय करोना प्रादुर्भावाची साखळी खंडित केली जाऊ शकत नाही. असे त्यांचे मत आहे त्यामुळे या अजब लॉकडाउन मुळे व्यापाऱ्याचे कंबरडे मोडले आहे तरी जिल्हा व तालुका प्रशासनाने सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडण्यास मुभा द्यावी व शनिवार-रविवार पूर्ण संचारबंदी लागू करण्यात यावी अशा स्वरूपाचे लॉकडाउनचे नव्याने नियम जाहीर करण्यात यावे असे प्रशासनाला या पत्रकात आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास व्यापारी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे