नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) – नेवासाफाटा येथे श्वास हॉस्पिटलच्या वतीने मक्तापुर रोडवर असलेल्या जुन्या माऊली हॉस्पिटलच्या जागेत नेवासा तालुक्यातील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून शासकीय दरापेक्षा कमी दरात कोविडच्या रुग्णांना सेवा देणार असल्याची माहिती हदयरोग तज्ञ डॉ.अविनाश काळे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देतांना श्वास हॉस्पिटलचे प्रमुख हदयरोग तज्ञ डॉ.अविनाश काळे म्हणाले की नव्यानेच नेवासा फाटा येथील मक्तापूर रोडवर जुन्या माऊली हॉस्पिटलच्या जागेवर आपण श्वास हॉस्पिटलच्या वतीने कोविड रुग्णालय सुरू केले असून सुमारे पन्नास बेडची सुविधा असलेल्या या कोविड हॉस्पिटलमध्ये तत्पर सेवा देण्यासाठी तज्ञ डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची यंत्रणा उभारण्यात आली आहे.
इमर्जन्सी रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. ६ व्हेंटिलेटर, आयसीयूयुक्त १२ बेडची, तर ऑक्सिजनयुक्त ४० बेडची ही व्यवस्था करण्यात आली आहे. नेवासा तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेवासाफाटा येथे कोविड रुग्णालयासाठी श्वास हॉस्पिटलने पुढाकार घेतल्याने नागरिकांची इतर ठिकाणी होणारी परवड ही दूर होणार असून नगर जिल्हयात ग्रामीण भागातील एकमेव सुसज्ज बेडयुक्त हे हॉस्पिटल असल्याचे डॉ.अविनाश काळे यांनी सांगितले.
मागील वर्षी नगरसह इतर ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी बेडची व्यवस्था नसल्याची समस्या उदभवल्याने नेवासा तालुक्याच्यातील भेंडा येथील नागेबाबा मंदिर स्ट्रस्टच्या भक्तीधाममध्ये आम्ही तालुक्यातील सुमारे ४५ डॉक्टर मंडळींना एकत्रित करून लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सुविधांनी युक्त असे कोविड हॉस्पिटल सुरू केले होते. सुसज्ज आयसीयू व मुबलक ऑक्सिजनची व्यवस्था यावेळी करण्यात आली होती.
जसजशी कोविड रुग्णांची संख्या घटली त्यानुसार हे कोविड सेंटर ही बंद करण्यात आले होते. २०२१ पासून वर्षातील पहिला महिना संपत नाही तोच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने नेवासा तालुक्यासह इतर ठिकाणच्या रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व करण्यात आलेल्या मागणीनुसार नेवासाफाटा येथील श्वास हॉस्पिटलच्या वतीने कोविड रुग्णालय आपण सुरू केले असून सुसज्ज सुविधांसह शासनाने ठरवून दिलेल्या शासकीय दरापेक्षा कमी दरात कोविड रुग्णांना सेवा देऊन जीवदान देण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे डॉ. अविनाश काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here