माळवाडगांव/प्रतिनिधी :- मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पोलिसांना गुंगारा देत माळवाडगाव येथून पसार झालेल्या मूथ्था बाप-बेट्याला श्रीरामपूर तालुका पोलिसांनी आज दि.९ रोजी जालना जिल्ह्यातून ताब्यात घेतल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव सह परिसरातील आठ ते दहा गावातील शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून माळवाडगांव येथील मुथ्था कुटुंबीय हे सहा फेब्रुवारी रोजी रात्री पसार झाल्याची घटना घडली होती

याबाबत सविस्तर माहिती अशी की दि. ०९.०२.२०२१ रोजी फिर्यादी विजय सिताराम आसने वय ६६ धंदा शेती रा. माळवडगाव ता. श्रीरामपुर जि.अहमदनगर यांनी श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली की, माळवडगाव येथील गेल्या २० वर्षा पासुन राहात असलेला व्यापारी १. रमेश रामलाल मुथ्था २. चंदन रमेश मुथ्था ३. गणेश रामलाल मुथ्था ४. आशा ऊर्फ अक्काबाई गणेश मुथ्था ५. चांदणी चंदन मुथ्था हे लोक माळवडगाव येथे राहुन भुसार व किराणा मालाचा व्यापार करीत असताना आरोपी यानी माळवडगाव येथील व परिसरातील गावा मधील अनेक शेतकरी लोकाचा विश्वास संपादन करुन त्याना त्याचे दुकानी सोयाबीन, हरबरा, मका असा भुसार शेतमाल बाजारभावापेक्षा जादा भाव देण्याचे अमिष दाखवुन शेतकरी याना विक्री करण्यासाठी भाग पाडुन परिसरातील सुमारे १०० ते २०० शेतकरी लोकाकडुन उदाहरीने शेतमाल सोयाबीन खरेदी करुन शेतकरी लोकाना पैसे देण्याचा वायदा केला शेतकरी लोकाना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा माळवडगाव व HDFC बँक श्रीरामपुर या बँकेत रक्कम शिल्लक नसताना खोटे चेक दिले व काही शेतकरी लोकाना वहीचे पानावर माल विक्रीच्या वजन मापाच्या चिठठया लिहुन देवुन शेतकरी लोकाचे पैसे न देता सुमारे २ कोटी रुपयाची फसवणुक करुन दि. ०६,०२,२०२१ रोजी रात्री माळवडगाव येथुन कुटुंबासह पळुन गेले, अशी फिर्याद दिल्याने श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन येथे वरील आरोपी विरुध्द गुन्हा रजि. नंबर २१/२०२१ भा.द.वि.क. ४२०, ४०६,४६४, ४०० ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर मा. मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. डॉ. दिपाली काळे अप्पर पोलीस अधिक्षक तसेच मा. संदिप मिटके साो उपविभागि पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन सदर आरोपीचे शोध घेण्यासाठी पोलीस पथके तयार करण्याच्या सुचना दिल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी आरोपीचे शोध घेण्यासाठी स्वता: तपासी अंमलदार असल्याने गुन्हयाचे गांभिर्ये ओळखुन आरोपीचे शोधकामी पोसई । अतुल बोरसे, पोहेकॉ/ नवनाथ बर्ड, पोहेकॉ/ राजेंद्र लवाडे, पोना/ अशोक पवार, पोना। प्रशात रणनवरे पोना/ दादासाहेब लोढे, पो ना। आबासाहेब गोरे, पोर्को। श्रीकांत वाबळे, पोको। काकासाहेब मोरे, पोकॉ. अनिल शेंगाळे तसेच मपोकॉ/ बबीता खडसे, मपोकॉ वंदना पवार असे पथक तयार करुन आरोपीचा टिटवळा जि. ठाणे, बलसार नवसारी राज्य गुजरात, सिन्नर जि. नाशिक, जळगाव, धुळे व जालना या भागात शोध घेवुन दि. ०४.०४.२०२१ रोजी गुन्हयातील आरोपी १. गणेश रामलाल मुथ्था २.. आशा उर्फ अक्काबाई गणेश मुथ्था याना गणपुर ता. चोपडा जि. जळगाव येथुन अटक करुन त्याची पोलीस कोठडी रिमांड घेवुन तपास करुन आरोपी गणेश रामलाल मुथ्था यांने दिलेल्या माहितीवरुन आरोपी नंबर ५. चांदणी चंदन मुथ्या हिला बलसाने ता. साक्री जि. धुळे या गावातुन दि. ०७.०४.२०२९ रोजी अटक करुन तीची पोलीस कोठडी घेतली आरोपी यांचेकडे अधिक तपास करता मुख्य आरोपी नंबर १. रमेश रामलाल मुथ्था २. चंदन रमेश मुथ्था हे जालना येथे असल्याची माहीती त्यानी दिली त्यावरुन जालना येथे दि. ०९.०४.२०२१ रोजी आरोपी यांना जालना येथुन ताब्यात घेण्यात आले. आरोपी यांना दि. १०.०४.२०२१ रोजी मा न्यायालयात हजर केले असता आरोपी १ ते ३ यांना दि. १५.०४.२०२१ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला असुन आरोपी नं ४ ते ५ यांना जामिनावर सुटका केली आहे

सदर आरोपी कडून ५,८०,५०० रुपयाचा मुददेमाल जप्त करणेत आला आहे. सदरची कारवाई मा. मनोज पाटील पोलीस अधिक्षक नगर, मा. डॉ. दिपाली काळे अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर तसेच मा. संदिप मिटक सा उपविभाग अधिकारी श्रीरामपुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मधुकर साळवे पोलीस निरीक्षक श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन त्याचे अधिनिस्त अंमलदार पोसई । अतुल बोरसे, पोहेकॉ/ नवनाथ बर्डे, पोहेकॉ/ राजेंद्र लवाडे, पोना/ अशोक पवार, पोना) प्रशात रणनवरे दादासाहेब लोढे, पोना/ आबासाहेब गोरे, साबरसेल श्रीरामपूर पो.ना फुरकान शेख, पोकॉ। श्रीकांत वाबळे, पोकॉ/ काकासाहेब गोरे, योकॉ। अनिल शेंगाळे, पोकॉ/ संदिप पवार तसेच मपोकों/ बबीता खडसे, मपोकॉ/ वंदना पवार, मपोकॉ/ प्रियंका शिरसाठ यांनी केली आहे.आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here