श्रीरामपूर :- कोरोना संक्रमण रोखण्यासाठी, जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी, जिल्ह्यात जमावबंदीसह संचारबंदी लागू केलेले असतांना देखील श्रीरामपूर शहरातील मेनरोड परिसरात असलेल्या पोपट भगीरथ महाले ज्वेलर्स, या सोनाराने शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून, छुप्या मार्गाने आपले दुकान सुरू ठेवल्याने, पालिका व पोलीस प्रशासने संयुक्त कारवाई करावी केली, ज्यात दुकानात १५ ते २० लोक असल्याने दुकानदार अमोल महाले यांना १ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित नागरिकांनी, पोलीस व पालिकेच्या करवाईवर तीव्र असंतोष व्यक्त करत, गरिबांवर अन्याय आणि श्रीमंतांना पाठीशी घालत ,असल्याचा आरोप केला असून, शासनाचे नियम सर्वांसाठी समना असतात, मग नियमांचे उल्लंघन करून लाखो रुपये कमवीणा-यांना, केवळ हजार रुपयांचा दंड, आणि सर्वसामान्य व्यावसायिकांना मात्र लाठीचा मारा आणि वरून दंड, हा कुठला न्याय, एकीकडे स्वतः जिल्हाधिकारी यांनी नियमांचे उल्लंघन करणा-या दुकाने सील करण्याचे आदेश, देऊन देखील, कारवाईत हा भेदभाव का, असा सवाल उपस्थित केलाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here