संपूर्ण राज्यात करोनाने थैमान घातल्याने सर्वधर्मीयांनी गर्दी टाळून सण-उत्सव घरीच साजरे करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन नेते, विचारवंत आणि साहित्यिक पुढे सरसावले असून त्यांनी यंदाची आंबेडकर जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष रितेश एडके यांनी केले आहे
श्रीरामपुर/प्रतिनिधी :- संपूर्ण राज्यात करोनाने थैमान घातल्याने सर्वधर्मीयांनी गर्दी टाळून सण-उत्सव घरीच साजरे करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन नेते, विचारवंत आणि साहित्यिक पुढे सरसावले असून त्यांनी यंदाची आंबेडकर जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन रितेश एडके यांनी केले आहे.
रिपब्लिकन नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी फेसबुक लाइव्हद्वारे यंदाची भीम जयंती घरीच साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. याला अनुसरून श्रीरामपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणं आव्यक असून गर्दी टाळणं गरजेचं आहे. त्यामुळे श्रीरामपुर तालुक्यातील जनतेने यंदा आंबेडकर जयंती घरातच साधेपणाने साजरी करावी, असं आवाहन रितेश एडके यांनी केलं आहे. १४ एप्रिलला आपल्या घरावर निळा झेंडा लावा. बाहेर जाहीर कार्यक्रम करू नका. मिरवणूक काढू नका. घरी राहा. पुरणपोळी करून घरीच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भीम जयंती साजरी करावी, असंही रितेश एडके यांनी म्हटलं आहे. यंदा गुढीपाडव्याच्या शोभायात्रा, रामनवमीचे कार्यक्रमही रद्द झाल्याचंही त्यांनी आंबेडकरी अनुयायांच्या निदर्शनास आणून दिलं आहे.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जमा केलेला निधी सफाई
कामगार, आरोग्य सेवक तसेच कोरोना रोखण्यासाठी जीव धोक्यात घालुन काम करणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या समूहाला द्यावा. त्याचं संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. अशा लोकांची चूल विझणार नाही, याची काळजी घ्यावी. या गरजू लोकांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात, असं सांगतानाच यंदाची जयंती आपण घरातच साजरी करावी. घरातील जयंतीचे फोटोज, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून इतरांनांही जयंती घरातून साजरी करण्यासाठी आवाहन करावे, अशी सूचनाही रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष रितेश एडके यांनी केले आहे