श्रीरामपूर – युवा नेते हा कुठल्याही पक्षाचे असो ते आणि आम्ही बरोबर असो अथवा विरोधात किंवा त्यांच्या जागी इतर कुठल्याही पक्षाची व्यक्ती असो नगरपालिकेशी संबंध नसलेली मंडळी नगरपालिकेत बसून दादागिरी करत असतील तर ते कोणाच्या जोरावर असले प्रकार या पुढच्या काळात आम्ही एक श्रीरामपूरकर म्हणून सहन करणार नाही. त्याच्या परिणामांचा विचार प्रशासनाने करायचा आहे त्याचा विचार आम्ही करण्याची गरज नाही असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी दिला आहे

प्रत्यक्ष नगरसेविका पती हे नगरसेवक नाहीत मात्र दिवसभर मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून ते नगरपालिकेचा कारभार बघतात ते कोणत्या अधिकारात व त्यांना कोणी बघायला सांगितला व त्यांना कोण पाठीशी घालते हे मुख्याधिकार्‍यांनी जाहीर करावं. माहितीच्या अधिकारात आम्ही आत्ता पर्यंत अनेक सीसीटीव्ही फुटेज मागितले पण ते आम्हाला मिळाले नाहीत मात्र नगरसेविका पती कारनाम्यांचा सीसीटीव्ही फुटेज काही मिनिटातच त्यांना मिळतो आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करतो हा कुठला प्रकार आहे..? यावरून नगरपालिकेचा कारभार कोण चालवतो आणि नगरपालिका कुठल्या दिशेने चालली आहे. हे आता श्रीरामपूरकरांना या पुढच्या काळात आम्ही सांगूच.

युवा नेते हे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत अनेक वर्ष मुळा-प्रवरा चे संचालक आहेत . श्रीरामपूरच्या समाजकारणात त्यांचे त्यांच्या परीने योगदान आहे अशा स्थितीत कुठल्याही कारणावरून श्रीरामपूर च्या राजकारणात पावसाळ्यात तयार होणाऱ्या कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे स्वतः बद्दल गैरसमज असलेले गुंड आणि टोळभैरे मंडळी त्यांच्याबरोबर गैरवर्तन करत असतील तर असले प्रकार त्यांच्याबरोबरच काय इतर कुणाच्याही बरोबर असे प्रकार घडल्यास पुढच्या काळात हे प्रकार सहन केले जाणार नाहीत ते सर्व श्रीरामपूरकर म्हणून आम्ही अंगावर घेऊन असा इशारा श्री चित्ते यांनी या पत्रकात दिला आहे.


युवा नेते यांना धक्काबुक्की नगराध्यक्षांना आनंद का?

नगराध्यक्ष या प्रकारा नंतर नगरसेविका पती यांचे माय बिग ब्रदर म्हणून कौतुक करतात. आणि तुझा अपमान तो माझा अपमान अशा पद्धतीच्या सोशल मीडियाला पोस्ट शेअर करून शहरातील गुंडगिरीला प्रोत्साहन देतात का? असा सवाल करून नगराध्यक्षा श्रीरामपूरला कुठल्या प्रकारचे वळण देऊ इच्छितात व त्याची दिशा त्यांच्या या वागण्यावरून स्पष्ट होत आहे :- भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here