श्रीरामपुर/प्रतिनिधी :- कोरोना विषाणूचा प्रभाव वाढू नये यासाठी भिम अनुयायी नी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण आपल्या घरीच अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करावी असे आवाहन भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर यांनी पत्रकाद्वारे केले आहे

कारण गेल्या वर्षापासून कोरोना या माहामारीने जगभरात थैमान घातले असून आपल्या जयंती साजरी करता आली नाही आज तीच परिस्थिती महाराष्ट्रात भयानक उद्भभवली आहे आपण नेहमी प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने फटाक्यांची आतिषबाजी यांनी भव्य मिरवणूक भिम गिते आदि कार्यक्रम घेत असतो पण अलीकडच्या काळामध्ये कोरोनाचा खूप मोठा धोका वाढत चालला आहे तो संसर्गजन्य असल्यामुळे गर्दी जास्त पसरतो त्यामुळे कार्यकर्ते व समाजबांधवांनी चौकाचौकात न जमता घराबाहेर न जाता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच आपल्या कुटुंबासह साजरी करत 14 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दीप प्रज्वलन करून अभिवादन करावे व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस वंदन करून बुद्ध वंदना ग्रहण करून अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करावी असे भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर यांनी म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here