नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) – रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने बळीराजा पुन्हा चिंतेत आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेड बिघडणार आहे.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झालेला असतानाच या मध्ये आता नव्याने भर पडून मागील वर्षीच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांनी रासायनिक खतांच्या किमतीत वाढ होत भाव गगनाला भिडल्याने आतापासूनच बळीराजा चिंतेत असून, शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार असल्याने खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमधून आत्ताच रोष व्यक्त करण्यात येत आहे.

बळीराजा प्रथम डीएपी खतला पसंती देत हे खत मोठ्या प्रमाणात खरेदी करून पिकांना देतात.मात्र यावर्षी खताचे भाव वाढल्याने खत मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.एक वर्षापासून कोरोणाच्या महामारीमुळे शेतकरी राजा चे कंबरडे मोडले असून मोठ्या संकटात सापडला आहे.परंतु याचे लोकप्रतिनिधींसह शासनाला कोणतेही गांभीर्य नाही.खरीप हंगामाच्या अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीची कामे सुरू केली आहे.प्रमुख रासायनिक खतांचे दर गगनाला भिडले आहेत.पण शेतमालाला मिळणारा भाव बघता हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाह.खतांच्या किमती वाढवायचे असल्यास शेतमालाचे देखील भाव वाढवणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.या वर्षी पुन्हा रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडणार असल्याने खताची दरवाढ झाल्याने बळीराजा मध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

मे महिन्याच्या अखेरीस बी-बियाणे खते खरेदी करून ठेवतात.त्यामुळे दुकानदारांनी देखील खते व बी-बियाणांची संबंधित कंपनीकडे नोंदणी केली आहे.शेतकरी डीएपी हे खत मोठ्या प्रमाणात पिकांना देतात.यावर्षी खताचे भाव वाढल्याने खत मिळेल की नाही.याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ४०० ते ५०० रुपये अधिक मोजावे लागणार गतवर्षी डीएपी खताच्या किमती १२०० रुपये प्रति बॅग होती.या वर्षी १५०० रूपये झाली आहे.शेतकऱ्यांना प्रतिबॅग ३०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. डीएपी सोबत ईतर सर्वच मिश्र खतांची किमती वाढल्याने सुपर फॉस्फेट पोटॅश आदी खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे.वर्षभरात कपाशी पिकाला तीन वेळा खत द्यावे लागते.तर सोयाबीन पिकाला एकरी एक बॅग खताची आवश्‍यकता असते.खतांच्या किमतीत सरासरी १५ ते १७ टक्के वाढ झालेली आहे.या भाववाढीचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

खतांच्या किमती सोबत तन नाशक,कीटकनाशक यांच्या भावात देखील वाढ झाली आहे.एकूणच उत्पादन खर्च वाढणार आहे आणि शेतीमालाचे भाव या तुलनेत कमी वाढत आहे.शिवाय नैसर्गिक संकटाचा फटका पिकांना बसत असतो.येणारे उत्पादन आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.दरवाढीमुळे मशागतीचे दर वाढल्याने गेल्या काही दिवसापासून पेट्रोल डिझेल चे भाव दररोज वाढत आहे.त्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी आपले दर वाढवले आहे.अंतर मशागतीचा खर्च सरासरीपेक्षा दीड पटीने वाढला आहे. पण आता भाव वाढल्याने बळीराजाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.

मागील वर्षीचे २०२० चे दर
(१९.१९.१९. किंमत १३५०)
(२८.२८.० किंमत १२८०)
(१०.२६.२६. किंमत १२९०)
(२०.२०.१३. किंमत ९७५)
(१५.१५.१५. किंमत १०६५)
(डीएपी१२००)
एप्रिल २०२१ चे दर
(१९.१९.१९.किंमत १७००)
(२८.२८.०. किंमत १७००)
१०.२६.२६. किंमत १५७५)
(२०.२०.१३. किंमत १४००)
(१५.१५.१५. किंमत १५५०)
(डीएपी १७००)
याप्रमाणे दरवाढ कंपन्यांनी केली आहे.


कच्च्या मालाचे भाव वाढले आहे असे दाखवून शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.समोर लगेच नवीन हंगाम येत आहे.सदरील कंपनीवर केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी वेळीच लक्ष घालून या मनमानी करणाऱ्या कंपन्यांना लगाम लावण्यात येऊन त्याच्या वाढलेल्या किमती कमी कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. :- संजय सुखधान वंचित बहुजन आघाडी.

रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झालेली ही शासनाच्या वरदहस्तामुळे कंपनीने केलेली आहे.खतांच्या किमतीत वाढ हवी असेल तर शेतीमालाला देखील भाव वाढवणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळेल शेतकरी अडचणीतून बाहेर निघेल. :- बापु कुटे शेतकरी, साईनाथनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here