नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) – शहरात अचानक सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्या पथकाने नेवासा श्रीरामपूर रस्त्यावरील गणपती मंदिर परिसरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केल्याने अनेकांची चांगली धावपळ उडाली शहरात पोलिसांच्या या कारवाईचे अनेकांनी अभिनंदन देखील केले

विनामास्क फिरणाऱ्या काही नागरिकांना या वेळी जागेवर दंडात्मक कारवाई करून रीतसर पावत्या देण्यात आल्या रात्री उशिरापर्यंत सदरील कारवाई या वेळी चालू होती सदरील कारवाई सुरू होताच शहरात विनाकारण फिरणाऱ्या टग्याची चांगली धावपळ सुरू झाली या सदरील पथकांमध्ये पोलीस उपनिरीक्षक भरत दाते , पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळशीराम गीते, वाहतूक पोलीस कर्मचारी किरण गायकवाड , आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here