श्रीरामपूर- रेमेडी सेवर इंजेक्शनचा काळाबाजार करत असताना मुद्देमालासह कामगार हॉस्पिटल जवळ दुपारी बारा वाजता दोन जणांना रंग्या धरून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते संध्याकाळी सहापर्यंत पोलिसांनी त्या आरोपींवर गुन्हा दाखल केलेला नव्हता पोलीस स्टेशन मध्ये थांबून सहा तास वाट बघून शेवटी वाट बघून गुन्हेगारांवर गुन्हा दाखल होऊन पुढील तपास होण्याकरता भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाउपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी अचानक गांधी चौकात धरणे सुरू केले शेवटी रात्री साडेआठ वाजता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी 215/2021 क्रमांकाने त्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केल्याचे महात्मा गांधी चौकातील धरणाच्या ठिकाणी येऊन श्री प्रकाश चित्ते यांना सांगितले तेव्हाच श्री चित्ते यांनी आपले धरणे मागे घेतले

याप्रसंगी भाजपचे नगरसेवक किरण लुणीया, टॅक्सी असोसीएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील मुथ्या, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, संजय पांडे ,बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी, अर्बन बॅकेचे माजी संचालक दीपक दुगड, सुदर्शन नगरीचे चेअरमन देविदास चव्हाण, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,श्रीराम तरुण मंडळाचे राजेंद्र सोनवणे, संजय रुपटक्के ,गणेश जायगुडे ,सोमनाथ कदम, संदीपबाळासाहेब मराळे वाघमारे ,सॅन्डी पवार, सुहास पवार, गणेश भिसे , बिट्टूशेठ ककड, अर्जुन करपे, बबन जाधव, संजय यादव ,शेखर आहेर,राजू पडवळ, रवी चव्हाण ,संदीप पवार, राहुल अस्वले, दर्शन चव्हाण,भारत शेळके, माउली जाधव ,मच्छिंद्र बहिरे ,दत्ता पवार ,दुर्गेश गायकवाड रात्री उशिरापर्यंत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


याबाबत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता सदर आरोपी विरुध्द 420, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला असुन. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील करीत आहे. अशी माहिती देण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here