नेवासा/प्रतिनिधी :- स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती नेवासे येथील सावित्रीबाई फुले-फातिमा शेख सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मा . अँड. प्रतिक तलवार, संपादक रिषभ तलवार, कार्यक्रमाचे संयोजक बहुजन नेते, मा. विकास चव्हाण , युवा नेते संनी चव्हाण, डॉ. भगवान वाळुजकर , प्रकाश चव्हाण, बापु जामदार, मुकिंदा आळपे, लश्मन चव्हाण ,शुभम चव्हाण, अनिल चव्हाण, आदी. उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात अँड. प्रतीक तलवार यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. बाबासाहेबांची दूरदृष्टी व त्यांच्या विचारांनी समस्त मानवतेला फायदा झाला असून भारतीय संविधानाच्या माध्यमाने प्रत्येक भारतीयला “मूलभूत अधिकार” प्रदान करण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला व खऱ्या अर्थाने देशाची गुलामगिरीतून मुक्तता केली, असे प्रभोदन अँड. प्रतीक तलवार ह्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालक विकास चव्हाण यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण केले व सर्व मान्यवरांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here