अहमदनगर/प्रतिनिधी :- भाजपा पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चा उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांचे जिल्ह्यातून सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. 


भाजपने जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे आपण तळागाळातील मतदारांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचून पक्ष वाढीवर भर देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी निवडीनंतर सांगितले आहे यापूर्वी अशोक लोंढे यांनी या युवा मोर्चा ता सरचिटणीस ता अध्यक्ष अनुसुचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस अशा विविध पदावर कामे केली आहेत

अशोक लोंढे यांच्या निवडीबद्दल उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंन्द्र गोदकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, सतीष सौदागर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस सुनिल वाणी, तालुका अध्यक्ष बबनराव मुठे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, दत्तनगरचे सरपंच सुनील शिरसाठ, राजणखोलचे सरपंच चांगदेव ढोकचोळे, दत्तनगर मा. उपसरपंच नानासाहेब शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here