कोपरगाव (प्रतिनिधी) :- मारुती सियांज कारमध्ये नेण्यात येत असलेली ६० किलो चांदी काल १७ एप्रिल २०२१ रोजी २१:०० वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई शनिवारी साईबाबा कॉर्नर कोपरगाव येथे करण्यात आली. या कारवाईत एकूण तब्बल ३५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि ,अहमदनगर जिल्हाअधिकारी यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक आदेशानुसार दि.१४/४/२०२१ अन्वये यांची अमलबजावणी करणे करीता साई कॉर्नर येथे नाकाबंदी करण्यात आली असता नाकाबंदी साठी तैनाद असलेले पो.नि.देसले पोलीस शिपाई खारतोडे,नवाळी,ग्रहरक्षक दलाचे कोळपे व थोरात आदिने समोरून येणारी मारुती सियांज कार कोपरगाव कडून शिर्डी मार्गी जात असता कारची काच खाली करून व तोंडाला मास्क-न लावता गाडी चालवताना निदर्शांत आला असता कारवाई करीता त्याला थांबविण्यात आले. आरोपी सौरभ अनिल पाटील (वय- २६ धंदा-व्यापार रा.राजगुरुनगर हुपरी जि.कोल्हापूर) त्यांनी सांगितले कि मी हार्डवेअर विक्रीकरणारा व्यापारी असून माझ्या गाडीत काहीहि नाही आहे असे सांगत होता.कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना सदर इसमावर संशय आला असता त्यांनी सदर इसम त्याच्या गाडीची झडती घेतल्या नंतर गाडीतील पाठीमागील सीट पाहता त्यास चैन बसवली होती व काही भाग फुगीर दिसत होता.त्यामुळे सदर चैन उघडून पाहता मागे चोर कप्पा बनवलेला व त्यात एक पांढऱ्या रंगाची गोनी लपवलेली होती.गोनी उघडून बघितली असता त्यात चांदीसदृश्य धातूचे ठोकळे आढळून आले असता पो.नि.देसले यांनी त्याला विचारणा केल्यावर उडवाउडवीच उत्तर देऊन

सदरील चांदी बाबाद समाधानकार उत्तर न दिल्याने पो.नि.देसले यांनी चांदी व सदर इसमास ताब्यात घेऊन पंचनामा करून सदर घटने बाबद वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री.मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सौ.दिपाली काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सताव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी नामे सौरभ अनिल पाटील(वय- २६ धंदा-व्यापार रा.राजगुरुनगर हुपरी जि.कोल्हापूर) याच्यावर कोपरगाव शहर पोलीस गुरव क्र.१२०/२०२१ महाराष्ट्र पोलीस कायदा १२४ सह भादवी १८८/२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हातील वापरलेली ५ लाख रुपये किमतीची मारुती सियांज कर क्रम MH १८ AJ ९०२० व तीस लाख रुपये किमतीचे ६० किलो चांदी असा एकूण ३५ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर गुन्हायचा तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ संजय पवार हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here