श्रीरामपूर- श्रीरामपूर परिसरातील सर्व खाजगी हॉस्पिटल कोव्ह्ड सेंटर येथे ९० टक्के बेड फुल झालेले आहे त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातील व डॉक्टर आंबेडकर वस्तीग्रहात असणारे बेडी कोरोना रुग्णांसाठी शिल्लक राहिलेले नाही त्यात कोरोना संसर्गजन्य रोगाने दिवसंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे शासनाने मोफत अंगीकृत असलेला म्हाडा संकुल येथील जवळपास ३०० रूम खाली असून त्या सर्व सोयीयुक्त आहे त्या ठिकाणी मोफत कोरोना सेंटर सुरू केल्यास जवळपास १०० रुग्णांची देखभाल वेळेत औषधोपचार ची सोय होईल या ठिकाणी माडाचे स्वतंत्र कंपाऊंड असल्याने कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वावरही होणार नाही विलीनीकरण तसेच कोरोना रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बेड उपलब्ध करावे अशी मागणी सर्व पक्षीय च्या वतीने प्रांताधिकारी साहेब अनिल पवार श्रीरामपूर नगरपरिषद चे मुख्य अधिकारी संजय शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहुजी कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा अधिक, उपनगराध्यक्ष करण ससाने, तसेच जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्याकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली, नातेवाईकांची ससेहोलपट थांबून कोरोना रुग्णावर त्वरित उपचार करण्यात येऊन त्यांचे प्राणही वाचेल या ठिकाणी परिस्थितीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शहर व परिसरातील मोठे मोठे हॉस्पिटल येथे डॉक्टर परिचारिका त्यांना पाचारण करून देऊन त्यांच्यामार्फत रुग्णांची देखभाल व औषधोपचार करण्यात येऊन मोफत शासन दरबारी प्रयत्न करून माडा संकुलन ते त्वरित कोरोना सेंटर सुरू करावे अशी मागणी सर्वपक्षीय करण्यात आली यावेळी कामगार नेते नागेश सावंत, राष्ट्रवादीचे लकी सेठी, काँग्रेसचे संजय छल्लारे, भाजपाचे मारुती बिंगले, गणेश राठी,आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे सचिन बडदे,वंचित बहुजन आघाडीचे चरण त्रिभुवन, शेतकरी संघटनेचे अहमद भाई जागीरदार, समाजवादी पार्टीचे जोएफ जमादार, काँ जीवन सुरडे, मराठा स्वयसेवक संघाचे राजेंद्र भोसले, आदिवासी पारधी संघाचे विजय काळे, गोंड आदिवासी संघटनेचे रंजीत जामकर, सुनील इंगळे, सिद्धार्थ खिल्लारे, अजय खिल्लारे रोहित भोसले, शादाब शेख, राजू यादव, आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here