श्रीरामपूर/प्रतिनिधी :- खाजगी कोवीड हॉस्पिटल चालकांनी कोरोना पेशंट कडून सुरुवातीलाच ॲडव्हास म्हणून मोठ्या रकमेची मागणी न करता रोजच्या रोज भरणा करून घ्यावा, श्रीरामपूरातील रेडमीसेव्हरचा स्टॉकिस्ट कडील स्टॉक प्रशासनाने रोजच्या रोज समाजमाध्यमांवर जाहीर करावा, व कोरोना संदर्भात विविध उपचारांच्या प्रकाराचे शासनाच्या परिपत्रकानुसार ठरविलेले दर सर्व हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावावे या संदर्भातील मागण्यांचे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अनिल पवार यांना भेटून दिले

भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, नगरसेवक किरण लुणीया ,संजय पांडे अभिजीत कुलकर्णी आदी या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. श्रीरामपूरातील कुठल्याही कोवीड हॉस्पिटल मध्ये पेशंटला ॲडमिट करताना ॲडव्हास म्हणून मोठ्या रकमेचा भरणा करून घेतला जातो. मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांची एकाच वेळेला एवढे पैसे भरण्याची ऐपत नसते त्यामुळे अशा कुटुंबांना पेशंटवर उपचार करून घेणे अवघड होऊन जाते. म्हणून पेशंटच्या रोजच्या उपचाराचे पैसे रोजच्या रोज भरून घेण्यात यावे अशी मागणीही यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार यांच्याकडे करण्यात आली यामुळे गोरगरिबांच्या व मध्यमवर्गीय पेशन्टच्या उपचाराचे अनेक प्रश्न सुटतील.

सध्या रेमडेसीव्हर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असुन आजही श्रीरामपूरात त्याचा काळाबाजार जोरात सुरू आहे. या काळाबाजाराला आळा घालण्याकरता प्रशासनाने श्रीरामपूरातील स्टॉकीस्ट कडील स्टॉक रोजच्या रोज समाज माध्यमांवर जाहीर करावा .नाशिक जिल्ह्यात तालुका अंतर्गत अशा पद्धतीने स्टॉक रोज समाज माध्यमांवर जाहीर केला जातो. त्यामुळे जनतेच्या मनातील शंका दूर होईल व त्या स्टॉकचा रोज उपयोग झाला की नाही हे प्रशासनाला स्पष्टपणे समजेल.

शासनाने करोना उपचारा संदर्भातील उपचार पद्धतीवर प्रत्येक उपचाराचे दर निश्चित केलेले असून शासनाने या दराचे अधिकृत परिपत्रकही काढलेले आहे. त्यानुसार सर्व कोवीड हॉस्पिटलला साधा बेड, o2बेड, rtpcr टेस्ट, रॅपिड टेस्ट, hrctl यासारख्या अनेक उपचारांचे दरपत्रक आपल्या दर्शनी भागात लावण्यास सांगावे अशी मागणीही यावेळी प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here