औरंगाबाद/प्रतिनिधी :- ब॒जाजनगरातील अष्टविनायक रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधून , दिवसभरात ऑक्सिजन नसल्याने ७ ते ८ रुग्णांना डीस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मिळाली.

याबाबत माहिती अशी की वाळूंज उद्योगनगरीत जवळपास १० खाजगी रुग्णालयात कोविड सेंटर सुरुवात करण्यात आले आहे मात्र आता ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना बळजबरीने डिस्चार्ज करण्यासाठी दबाब वाढविण्यास सुरुवात केली आहे. दुसर्‍या शासकीय व खासगी रुग्णालयांतही बेड शिल्लक नसल्याचे कारण दिले जात. असल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हवालदिल बनले आहेत.

उपचारासाठी आगाऊ रक्‍कम भरूनही रुग्णालयांकडुन बळजबरीने डिस्चार्ज केले जात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. डीस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांत बजाजनगरातील ५० वर्षीय महिलेचा समावेश असून तिला नातेवाइकांनी सिडको वाळूज महानगरातील अन्य दुसऱ्या खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे नातेवाईकांनी सांगितले याचबरोबर वैजापूर तालुक्‍यातील जिरी गावातील एक पुरुष रुग्ण व वसुसायंगाव एका महिला रुग्णालाही दुसर्‍या रुग्णालयात घेऊत जाण्याचा सल्ला दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

याबाबत काही खासगी डॉक्टरांशी संपर्क केला असता, एजन्सीकडून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने नाईलाजास्तव डिस्चार्ज दिला जात असल्याचे, नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here