श्रीरामपुर/प्रतिनिधी :- गेल्या साडे चार वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या जीवावर नगराध्यक्ष झालेल्या आदिकांनी पुढच्या काळात शहरातील भाजप संपविण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपचे कार्यकर्ते निष्ठवंत असल्याने आदिकांचे मनसुबे उधळले गेले.

मुळात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाचा ठराव शहरातील सर्वपक्षीय ३५ नगरसेवकांच्या मंजुरीने घेण्यात आलेला आहे. त्यासाठी लागणारा खर्च श्रीरामपूर नगरपालिकेच्या तिजोरीतून म्हणजेच जनतेच्या पैशातून होणार आहे. असे असतानाही ज्यांच्याकडे भाजपचे कोणतीही जबाबदारी नाही असे काही स्वतः चे बगलबच्चे बोलवून भाजप शहर व तालुकाच्या नावाने आभारपत्र घेवून सर्व कामाचे श्रेय घेत गुलाल उधळण्याचा हास्यास्पद प्रयत्न नगराध्यक्षा अनुराधा आदिकांनी केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताचा कायदा मंजूर केला मात्र त्यास ट्रॅक्टर रॅली काढून विरोध करण्याचे पाप करणाऱ्या नगराध्यक्षा अनुराधा अदिकांची कारकीर्द शहराचे वाटोळे करणारी ठरली आहे. मुळात आदिकांचे आभार मानणा-यांमध्ये एकही जन भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी नाही. स्वतःच्या जागेतील टपऱ्या काढणे, अडचणीचे प्लॉटचे साटेलोटे करणे, ठेके घेणे अशा स्वफायद्याच्या कामासाठी नगराध्यक्षा आदिकांच्या दरबरात हुजरेगिरी करणाऱ्या लोकांचा व भाजपाचा कोणताही संबंध नसून पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष मारुती बिंगले, तालुकाध्यक्ष बबन मुठे व सर्व जिल्हा पदाधिका-यांच्या नेतृत्वाखाली आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजप संपूर्ण ताकदीने स्वतंत्रपणे उतरणार आहे.

आदिकांची हुजरेगिरी करणाऱ्या लोकांचा व भाजपचा काडीमात्र संबंध नसल्याने पुढे जर कोणी पक्ष संघटनेच्या नावाने परस्पर पत्रक, सोशल मीडिया अकाउंट, किंवा स्वफायदयाचे खाजगी विषय हाताळले तर पक्षान्तर्गत शिस्तभंग किंवा फ़ौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल असे प्रतिपादन शहराध्यक्ष मारुती बिंगले व तालुकाध्यक्ष बबन मुठे यांनी संयुक्त पत्राद्वारे केले आहे.

दरम्यान, आभारपत्र देणाऱ्या आदिकांच्या लाभार्थी व्यक्तींचा आणि भाजपचा कोणताही संबंध नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार असल्याने आदिकांची वाट खडतर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here