श्रीरामपुर/प्रतिनिधी : – लॉकडाऊनमध्ये सर्व नागरिक घरी असताना आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उभे राहून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणा-या श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. ओम महाले यांच्या संकल्पनेतुन श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले व यांच्यातर्फे हे सुरक्षिततेचे साहित्य पोलीस बांधवांना आज (बुधवार) देण्यात आले.

पोपट भगीरथ महाले या फर्म चे डायरेक्टर ओम महाले म्हणाले, ”कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी देशभरात १५ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिक घरी बसून आहेत. पोलीस बांधव मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:च्या आयुष्याची पर्वा न करता रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. आपली काळजी घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये”, असे आवाहन ओम महाले यांनी केले.

श्रीरामपुर पोलीस ठाण्यात १०१ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांना ओम महाले यांच्यातर्फे १०१ सॅनिटायझर, १०१ मास्क देण्यात आले. यावेळी उपअधीक्षक डॉ दिपाली काळे व श्रीरामपुर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या कडे देण्यात आले याप्रसंगी गणेश बागडे, गौरव काळे व ओम महाले मित्र परिवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here