श्रीरामपूर/प्रतिनिधी :- येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षपदी स्वामीराज कुलथे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर अध्यक्षपदी राहाता येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा ज्युनिअर कॉलेजचे प्रा. डॉ. शिवाजी एकनाथ काळे यांची निवड झाली.त्यांनी कार्यकारिणीतील साहित्यिक, संमोहनतज्ञ डॉ.रामकृष्ण सोन्याबापू जगताप यांची उपाध्यक्षपदी,’वर्ल्ड सामना’चे कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे,सचिवपदी खोकर येथील गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका कवियित्री सौ.संगीता अशोकराव कटारे उर्फ संगीता चंद्रभान फासाटे तर सौ.आरती गणेशानंद उपाध्ये यांची कोषाध्यक्षपदी निवड घोषित केली.

वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. बाबुराव उपाध्ये,माजी प्राचार्य टी.ई.शेळके,माजी प्राचार्य शन्करराव अनारसे, माजी प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे,महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे,विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुकदेव सुकळे, प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष लेविन भोसले, प्रा.शिवाजीराव बारगळ हे मार्गदर्शक आहेत. कार्यकारिणीत नेवासा येथील प्रा.सुनील चन्द्रशेखरधस, टाकळीभानचे शेतकरी कवी पोपटराव पटारे, मा.मुख्याध्यापक किसनराव वमने, मा.मुख्याध्यापक भागवतराव मुठे, मोखाडा येथील प्रा.विलासराव शिवाजी तुळे यांची निवड झाली आहे. 1990 पासून साहित्य प्रबोधनचे साहित्य कार्य सुरु झालेले आहे. डॉ. बाबुराव उपाध्ये, कवी राधाकिसन देवरे,कवी डॉ.शिवाजीराव काळे, पत्रकार प्रकाश कुलथे यांनी वेळोवेळी अध्यक्षपद भूषविले आहे.डॉ.शिवाजी काळे यांची दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.मावळते अध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे, मार्गदर्शक माजी प्राचार्य तुळशीराम शेळके यांनी डॉ.शिवाजी काळे यांच्या नावाची सूचना केली.अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे व उपाध्यक्ष डॉ. रामकृष्ण जगताप म्हणाले, सर्वांच्या सहकार्यातून श्रीरामपूर साहित्य संमेलन सुरु करून श्रीरामपूर लेखक, कवी, कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.कार्याध्यक्ष स्वामीराज कुलथे यांनी श्रीरामपूर साहित्य संमेलन यशस्वी करण्यात आपण पुढाकार घेऊ असे सांगून सर्वांचे आभार मानले.नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here