श्रीरामपुर/प्रतिनिधी :- संपुर्ण देश आणि राज्य मदे तसेच नगर जिल्ह्यामध्ये कोरोना आजाराचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना खासदारांनी पुढाकार घेऊन तीनी मंत्र्यांना सोबत घेऊन योग्य पाठपुरावा वेळेवर केले असते तर रुग्णांना घेऊन वणवण भटकण्याची वेळ जनतेवर आली नसती

शिर्डी लोकसभेचे खासदार जनतेला वाऱ्यावर सोडून मिस्टर इंडिया पिक्चर मधल्या हिरो सारखे जनतेतून गायब झाले आहेत व पिक्चर मधल्या हिरो सारखे त्यांच्या ठराविक लोकांनाच दिसतात. सर्व सामान्य जनतेला आपले खासदार कोरोना महामारी च्या संकटात काहीही मदत का करत नाही? असा प्रश्न पडलेला आहे.राज्यात त्यांची सत्ता असताना जिल्ह्यात त्यांचे सत्ताधारी पक्षाचे तीन तीन मंत्री असतांना देखील त्याचा फायदा जनतेला खासदाराला करून देता आलेला नाही.व या संकटकाळी गोरगरीब जनतेला कुठलीही मदत न करता गायब झाले.नगर जिल्ह्याचे दक्षिनेतील खासदार हे पहिल्यादाचं निवडून आलेत तरी देखील तीन ते चार दिवसापूर्वी रेमेडेसीविल इंजेक्शन चा साठा आणून रुग्णांना मदत केली.व जिल्ह्यातील इतर आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदार संगात मोठमोठे कोविड सेंटर उभारली तसेच इतर हॉस्पिटल ला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची देखील मदत करण्यात आली व अनेक रुग्णांचे नातेवाईकांच्या सुखादुखात सहभाग घेऊन मदत करताना दिसत आहे. तसेच श्रीरामपुर तालुक्यात प्रथमच निवडून आलेले आमदार,नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मदत करत असल्याचे दिसत आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटा मध्ये निवडून आलेल्या खासदाराचे कुठलिही मदत शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनतेला झालेली नाही.या कोरोना आजाराच्या महामारी मध्ये अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड,व्हेंटिलेटर व रेमेडीसीविर इंजेक्शन मिळत नाही,यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहे ,

हे घरातील इतर नातेवाईकांना डोळ्यानी बघवत नाही.अनेकांचे संसार उध्वस्त झाले. अशी भयंकर परिस्थिती नागरिकांना देखवत नाही असे असताना खासदारांना लोकांवर आलेले भयंकर संकटाची काही देणेघेणे नाही असेच वाटत आहे अशा परिस्थितीत आपले लोकप्रतिनिधी आपल्याला मदत करणार नाही तर कधी मदत करतील असा प्रश्न जनतेला पडला आहे,जे खासदार निवडणूक च्या वेळी घरोघरी येऊन हाता पाया पडून मतांची भीक मागत होते, तेच खासदार आजच्या संकटाच्या काळात आमच्या मदतीला का येत नाही असे विचार नागरिकांच्या मनामध्ये येत आहे.

खासदारांनी लवकरात लवकर कोरोना रुग्णांसाठी भव्य 1 हजार, ते 2 हजार बेड चे कोरोना सेंटर उभारून त्यामध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर ची मोठया प्रमाणात व्यवस्था करावी.त्यांच्यावर विश्वास टाकून निवडून दिलेल्या शिर्डी मतदार संघातील नागरिकांना दिलासा द्यावे, आणि खासदारा कडून या कोरोना महामारी मध्ये नागरिकांना मदत करता येत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा दयावा जेणेकरून जनतेला त्यांच्या हक्काचा व जनतेच्या सुखा दुखात सहभाग घेणारा खासदार निवडून आणता येईल.असे. मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे हे म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here