कोपरगाव : तालुक्यातील गवारे नगरमधील रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे भागातील नागरिक तसेच येथील वाहनचालकासह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. अखेर या खराब रस्त्याच्या दुरुस्तीचे काम नुकतेच चालू केले आहे. या रस्ता दुरुस्तीमुळे काही प्रमाणात का होईना वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ग्रामस्थांत मोठी नाराजी होती काही दिवसांपूर्वी आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष संदीप कपिले यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भागातील समस्या बद्दल निवेदन देण्यात आले होते त्याचं निवेदनाला अखेर यश आले असे भागातील नागरिक म्हणणे आहे
या रस्ता दुरुस्तीमुळे काही प्रमाणात का होईना वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या रस्त्यांमुळे वाहनचालकासह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. अखेर या खराब रस्त्याच्या दुरुस्तीचे कामामुळे ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.