श्रीरामपूर(प्रतिनिधी)- येत्या १ मे पासून २०२१ पासून १८ वर्षापुढील सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोड, प्रभाग क्र.१६ मध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे या मागणीचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांना मोरया फाऊंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पा. यांनी दिले.

याबाबत बोलताना केतन खोरे यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण केल्याशिवाय कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे अशक्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. सध्या श्रीरामपूर तालुक्यात ग्रामीण रुग्णालय येथे एकच लसीकरण केंद्र सुरू आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी या ठिकाणी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात हे केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. बेलापूर रोड परिसरात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खोरे यांनी सांगितले.

आरोग्य प्रशासनाने बेलापूर रोड परिसरात हे केंद्र सुरू केल्यास त्यांना मोरया फाऊंडेशनतर्फे सर्वोतपरी सहकार्य केले जाईल. प्रभागातील नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध करून देत सर्वांचे लसीकरण करण्याची आपण जबाबदारी घेणार असल्याचे केतन खोरे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here