श्रीरामपुर/प्रतिनिधी :- कोरोना महामारी ने संपूर्ण देशात हाहाकार होत आहे त्यातच आपल्या नगर जिल्ह्यातील खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच श्रीरामपूर तालुक्यात वैद्यकीय सेवेच्या नावाखाली भरपूर कोविड सेंटर चालू झाले आहेत परंतु डिपॉझिट च्या नावाखाली गोर गरिबांकडून अवाच्या सव्वा पैसे उकळण्याचे काम करत आहे ‌एकतर लॉकडाऊन मुळे लोकांना काम नाही लोक बेरोजगारी वाढली आहे त्या मध्ये हॉस्पिटल वाले महागडी औषधे ऑक्सिजन सांगत असल्यामुळे लोक सोने गहाण ठेवून कोणी व्याजाने पैसे घेऊन पूर्तता करण्याचे काम चालू आहे एवढे करून सुद्धा पैसे संपल्यावर कोविड सेंटर वाले सांगतात रुग्ण दुसरीकडे हलवा आणि पैशाअभावी दुसरीकडे ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे रुग्ण दगावतात त्यासाठी कोविड सेंटर महाराष्ट्र शासनाने जे प्रायव्हेट कोविड सेंटर साठी दर पत्रक लागू केले आहे ते त्यांनी कोविड सेंटर च्या बाहेर लावावे जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना दिसले पाहिजे ते लावल्याने गोर गरिबांची लुट होणार नाही असे न झाल्यास आणि गोरगरिबांची लूट कोविड सेंटर वाले करत राहिले तर आम्ही भीमशक्ती संघटनेच्यावतीने कोविड सेंटर समोर चालवण्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी एका पत्रकाद्वारे दिला व जर कोविड सेंटर वाले लूट करत असेल तर आमच्याशी संपर्क करा असे मगर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here