श्रीरामपूर – देशात विदेशात सर्वधर्मसमभाव म्हणून प्रसिद्ध असलेला श्री साईबाबा संस्थानने ५००० बेडचे कोविंड सेंटर व त्यात १००० ऑक्सिजन बेड त्वरित सुरू करावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालक मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे साईबाबा संस्थान हे जग प्रसिद्ध आहे त्या संस्थांनी देशावर आलेल्या संकटाच्या वेळी मोठे आर्थिक मदत केली आहे अनेक संस्थान हॉस्पिटल ला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे साईबाबा संस्थांकडे मोठ्या प्रमाणात निधी जमा असून या निधीमधून पाच हजार रूम मध्ये जम्बो क्विट सेंटर त्वरित सुरू करावे या शिर्डी संस्थेने कुठल्या एका धर्माचा नसून हे सर्व धर्माचे आहे जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च होणार असल्याने साईबाबाचे आशीर्वाद या रूपाने कोविड सेंटर मध्ये उपचार घेणाऱ्याला रुग्णाला मिळतील साई संस्थांकडे मोठ्या कर्मचारी वर्ग आहे रूग्णांसाठी सर्व सुखसोयी आहे शिवाय शिवथाळी मोफत देण्याची घोषणा करून शिवथाळी सामान्य नागरिकांना देण्यात आली त्याच धर्तीवर साईबाबा संस्थानने कोविंड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन सुरू करावे साई संस्थान पाच हजार रूम ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू केल्यास हा संदेश इतर धार्मिक सरांकडे जाऊन ते असाच निर्णय घेतील अशी आशा आम्ही बाळगतो देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहे शिर्डी संस्थान कोरोनाच्या महामारीत जम्बो कोविंड सेंटर सुरू केलास त्याची जागतिक पातळीवर नोंद होईल असेही निवेदनात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल डुंगरवाल यांनी म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here