नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) – नेवासा पोलीस ठाण्यातील कर्मचारी व पोलीस निरीक्षक कोरोनाला हरवून पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी झुंजणाऱ्या पोलिसांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.नेवासा पोलीस ठाण्यातील जवळपास निम्मे अधिकारी व कर्मचारी कोरोनावर मात करून पुन्हा एकदा कर्तव्यावर रुजू झाले आहे.पोलीस निरीक्षकही कोरोनावर विजय मिळवून गेल्या दोन दिवसापासून सेवेस हजर झाले आहे. नेवासा पोलीस ठाण्यात एक पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षक तर 60 पोलीस कर्मचारी आहे. यातील 50 टक्क्यांहून अधिक जणांना कोरोनची बाधा झाली. यातील सर्वजन बरे होऊन कर्तव्यावर हजर झाले. अजूनही सात कर्मचारी कोरोनावर दवाखान्यात उपचार घेत आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.त्यामुळे नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी पोलीस रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहे.या कठीण काळात दिवसरात्र सेवा देणाऱ्या नेवासा पोलिस ठाण्यातील पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
संचारबंदीवरून सरकारने कडक निर्बंध लावले असले तरी अनेक जण पोलिस यंत्रणेला चकवा देत आहे.त्यांना चाप लावण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे.गेल्या वर्षभरात नेवासा पोलीस ठाणे व त्याअंतर्गत कुकाणे पोलीस दूरक्षेत्रातील जवळपास 70 टक्के कर्मचारी कोरोनाला हरवुन आले आहे.पोलिसांसह व त्यांचे कुटुंबीय यांची संख्या तर अधिकच आहे. नेवाशाच्या पोलीस निरीक्षकांना नेवासा ठाण्याचा कार्यभार हाती घेताच त्यांना पहिल्याच टप्प्यात कोरोनाशी झुंजावे लागले.आता कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी हीच पोलिस यंत्रणा जीवावर उदार होऊन कामाला लागली आहे.पोलीस लोकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करतात.याचा लोकांना विसर पडला आहे.
लॉकडाऊनच्या काळातही पोलिस यंत्रणाच टीकेचे धनी बनत आहे.मात्र पोलिसांना जीव धोक्यात घालून कशी कामे करावी लागतात याचा अंतर्मुख होऊन विचार केल्यास पोलीसही माणूसच आहे त्यांनाही जीव आहे याचा उलगडा होईल.
लॉकडाऊनच्या कडक निर्बंधसाठी महसूल यंत्रणाही कार्यरत असते.मात्र जनतेसमोर जावे लागते ते पोलिस यंत्रणेलाच, प्रत्यक्ष बेजबाबदार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कायदेशीर धडा पोलिस यंत्रणेलाच शिकवावा लागतो.त्यामुळे कर्तव्यावर असताना जनतेशी थेट संबंध पोलिसांचा येत असल्याने, सरकारी यंत्रणेत सर्वाधिक बाधितांची संख्या पोलीसांचीच आढळते. :- विजय करे पोलिस निरीक्षक. नेवासा.