श्रीरामपुर/प्रतिनिधी :- राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाकडून लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहेत. मात्र याउलट श्रीरामपूर येथे लसीकरण केंद्रावर लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने ‘कोणी लस देता का लस’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या लसीकरण केंद्रावर लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली जात आहे. मात्र, काल २०० डोस उपलब्ध होते, तर ५०० हुन अधिक नागरिकांची उपस्थिती होती.

तर, आज लसीचे केवळ १२० डोस उपलब्ध होते. यावेळीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. आज कोवॅक्सिन या लसीचा डोसच उपलब्ध असल्याने इतर कंपनीची लस घेतलेल्या व १२० पेक्षा अधिक असलेल्या नागरिकांनी घरी जावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here