श्रीरामपुर/प्रतिनिधी :- संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. अनेक व्यक्ती विशेष व्यक्ती. राजकीय पुढारी. लेखक. गायक. पत्रकार संपादक यासह विविध क्षेत्रात नावाजलेली माणसे मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक ठिकाणी अमरधाम मध्ये तासनतास उभे राहून अंत्यविधी पार पाडले जात आहेत यामुळे कोरोना या महामारीने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांची ससेहोलपट सुरू आहे काही ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात येत नाही त्यामुळेही कोरोना संसर्ग होऊन अनेक व्यक्ती बाधीत होत आहेत श्रीरामपूर शहरातील अमरधाम या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून विद्युतदाहीनी बांधण्यात आलेली आहे तरी सदर विद्युतदाहीनी त्वरित सुरू करून कोरोनाने मृत्यू पावलेल्या सर्व जाती धर्माचे व्यक्तींचा अंत्यविधी विद्युतदाहीनी मध्येच करण्यात यावेत. या आशयाचे निवेदन श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी पी.बी.जाधव यांना देण्यात आले. या वेळी कामगार नेते नागेश सावंत युनियन राज्य कार्यकारणी सदस्य राजेंद्र भोसले. युनियन चे अमोल सावंत. कल्पेश शर्मा. आदी. उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here