नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) – वंचित बहुजन आघाडीचे युवानेते संजय सुखधान यांनी पालकमंञी हसन मुश्रीप यांना काळे झेंडे दाखविण्याच्या धास्तीने अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नेवासा येथील आढावा बैठक अवघ्या काही मिनिटात आटोपती घेत दुसरीकडे ते रवाना झाले.
   
गुरुवार (दि.२९) रोजी पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीचे पत्रक आल्या नंतर संजय सुखदान यांनी पालकमंत्री यांना आपण काळे झेंडे दाखवून राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले पालकमंञी निष्क्रिय असून नगर जिल्यात कोविड मुळे उपचार अभावी जी लोक मृत्युमुखी झाले त्यांच्या मृत्यूची जबाबदारी पालकमंत्र्यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा म्हणून काळे झेंडे दाखवून राजीनामा मागणार अशी मागणीचे पत्रक सोशल मीडिया आले,याची दखल प्रशासनाने घेऊन सुखधान यांनी हे आंदोलन करू नये म्हणून सुखदान यांना आंदोलन न करण्यासाठी परावृत्त केले पण सुखदान हे आपल्या भूमिकेवर ठाम होते, म्हणून पालकमंत्र्यांच्या दौऱ्या अगोदर सुखधान यांना उपविभागिय पोलिस अधिक्षक मुंढे यांनी बोलावून घेऊन आंदोलन करू नका,आम्हाला तुम्हाला पालकमंत्री यांचा दौरा होईपर्यंत तुम्हाला इथेच नजर कैदेत रहावे लागेल असे सांगितले,परंतु सुखधान हे आपल्या भूमिकेवर ठाम होते,संविधानाने निषेध करायचा अधिकार प्रत्येकांना दिलेला आहे असे यावेळी सांगितले.
 
माञ सुखधान यांनी पोलिसांचे म्हणणे ऐकून घेत पोलिस ठाण्यात आपली घोषणाबाजी सुरुच ठेवली या नाट्यमय घडामोडीमुळे पालकमंञी मुश्रीप यांनी आपला दौरा काही मिनिटात आटोपता घेत दुसरीकडे पसार झाल्याचे सुखधान यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here