नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) – नेवासा येथे कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या आढावा बैठकीसाठी शुक्रवार (दि.३०) रोजी दुपारी साडेबारा वाजता पंचायत समिती सभागृहात आलेल्या राज्याचे ग्रामविकास मंञी तथा नगर जिल्ह्याचे पालकमंञी हसन मुश्रीप यांच्या बैठकीच्या सुरुवातीलाच प्रशासनाकडून तहसिलदार रुपेशकुमार सुराणा व तालूका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांनी कोरोना संदर्भात सर्वकाही साळसूद असल्याचे दाखवून देत असतांनाच या बैठकिस उपस्थित असलेले माजी आमदार पांडूरंग अभंग व शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा चांगलाच पार चढला अधिकारी सगळ काही व्यवस्थित असल्याचे सांगत असतांनाच माजी आमदार अभंग तडकन उभे राहीले अन् त्यांनी त्यांचा पाढा सुरु केला. ते म्हणाले की,तालूक्यात आरोग्य यंञना आहे तर यंञ सामुग्री नाही, स्टाफ आहे तर किट नाही अशी परिस्थिती आहे.रुग्णांना साधा प्राथमिक उपचारही सध्या वेळेवर घेता येत नाही रुग्ण तडफडून मरत आहेत ऑक्सिजन व रेमडेसवीर मिळत नसल्याचे पालकमंञी मुश्रीप यांच्या लक्षात आणून दिले. व त्यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली.
तर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी पालकमंञ्यांसमोर मी सुद्धा येथे मागील पंधरा दिवसापुर्वी आढावा बैठक घेतली बैठकीत ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देण्यासह रुग्णावाहिका आणण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगितले सर्व काही असतांना नियोजनच जर योग्य होत नसेल तर उपयोग काय ? असा सवालही लोखंडे यांनी उपस्थित करत किट उपलब्ध करुन देण्याची मागणी पालकमंञी मुश्रीप यांच्याकडे करत श्रीक्षेञ शनिशिंगणापूर येथे देवस्थानच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड वाढविण्याची मागणी केली शिंगणापूर येथे ऑक्सिजन निर्मिती चालू करण्यासाठी पालकमंञ्याचे वेधले माणसे वाचली पाहीजे त्यासाठी योग्य नियोजनही महत्वाचे आहे ही जबाबदारी तालूका प्रशासनाची आहे अर्थिक बाजू संभाळण्यासाठी शासन आहे असेही यावेळी खासदार लोखंडे यांनी स्पष्ट केले.
पालकमंञी हसन मुश्रीप यांना नेवासा दौऱ्यात वंचित बहूजन आघाडीचे युवानेते संजय सुखधान यांनी काळे झेंडे दाखवून पालकमंञ्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे जाहिर केल्यामुळे सुखधान यांना नेवासा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पालकमंञी मुश्रीप यांनी अवघ्या अर्धा तासाच्या आत दौरा आटोपता घेत बैठक गुंडाळली या बैठकीत कोणताही तोडगा निघला नाही त्यामुळे पालकमंञी मुश्रीप यांचा दौराच निष्पळ करतोय की,आता रुग्णांचे जीव वाचतात हाच खरा प्रश्न नेवासकरांच्या मनात घर करुन उभा आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असतांना पालकमंञ्यांच्या बैठकीच्या गराड्यात सोशल डिस्टंन्सचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.