श्रीरामपुर- शहरातील दत्तनगर भागातील कुंकूलोळ परिवाराने अहमदनगर येथील लोढा ऑक्सीजन कंपनी मधून श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय येथे २० टाक्याची गाडी सचिन नारळे यांच्या हस्ते आणली यावेळी प्रेमचंद कुंकूलोळ हे म्हणाले कोरोना महामारीचं सध्या ऑक्सिजनचा मोठा तुटवडा नगर जिल्ह्यात जाणवत असल्यामुळे श्रीरामपूर शहरात सुद्धा तीच परिस्थिती आहे याकरिता आम्ही कोणत्याही मोबदल्याची आशा न करता नगर या ठिकाणावरून जेवढे जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध होतील याकरिता आज आम्ही स्वताची गाडी पाठून शहरातील लोकांचा मृत्यू ऑक्सिजन करिता होऊ नये याकरिता उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ योगेश बंड यांना आम्ही विंनती करून खादी ग्राम उद्योगचे चेअरमन प्रेमचंद कुंकूलोळ यांनी विना मोबदला गाडी उपलब्ध करून दिली व जोपर्यंत रुग्णालयास गरज असेल तोपर्यंत ही सेवा मोफत देणार असल्याचे प्रेमचंद कुंकूलोळ यांनी सांगीतले

या सेवेत कुंकूलोळ परिवारातील भगवान कुंकूलोळ, प्रेमचंद कुंकूलोळ, मनोज कुंकूलोळ, निलेश कुंकूलोळ यांनी सहकार्य केले आहे याकामी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, दत्तनगर लोकनियुक्त सरपंच सुनिल शिरसाठ, भरत जगदाळे, दिनेश तरटे सर, सागर शेवाळे, रावसाहेब शिदे, सतीश कदम, रवि विखे, संतोष पवार, ग्रामपंचायत सदस्य कैलास पगारे, प्रतीक कासलीवल, पत्रकार स्वप्नील सोनार आदि मोलाची मदत करत आहे कुंकूलोळ परिवार नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असते शहरातील नागरिक कडुन कुंकूलोळ परिवाराचे कौतुक केले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here